- Marathi News
- National
- Lakhimpur Voilance | Ashish Misra Bail | Marathi News | Bail Granted To Ashish Mishra, Accused In Lakhimpur Kheri Violence Case During UP Elections; He Had Been In Jail For Five Months
नवी दिल्ली11 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
- लखीमपुर खेरी हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि गृहराज्य मंत्रीचा मुलगा आशिष मिश्राला जामीन मंजूर, पाच महिन्यापासून होता जेलमध्ये बंद
लखीमपुर खेरी हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला जामीन मिळाला आहे. उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. लखीमपुर खेरीमध्ये शेतकऱ्यांचा हत्येचा कट आरोपी आशिष मिश्राने रचला होता. तो गेल्या पाच महिन्यापासून जेलमध्ये होता. त्याला 9 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अटक केली होती.
3 ऑक्टोबरला रचला होता कट
लखीमपुर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर नेपाळच्या सीमेजवळ असलेल्या तिकुनिया गावात दुपारी तीन दरम्यान शेतकरी आंदोलन करत होते. त्यादरम्यान अचानक तीन गाड्या आल्या आणि आंदोलन शेतकऱ्यांना चिरडले होते. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते. या घटनेत आठ जणांना मृत्यू झाला होता. ज्यात 4 शेतकरी. एक पत्रकार आणि दोन भाजप कार्यकर्ते यांचा समावेश होता.
विरोधकांनी केली होती अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी
केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलगा आरोपी आशिषने शेतकऱ्यांची हत्या करण्याचा कट रचला होता. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. आशिषला अटक केल्यानंतर विरोधकांनी अजय मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावी अशी मागणी केली होती. मात्र मोदी सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नव्हता.
निवडणुकीच्या तोंडावर जामीन मंजूर
आरोपी आशिष मिश्राला निवडणुकीच्या तोंडावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी अनेक पक्ष एकत्र आले आहेत. अशातच निवडणुकीच्या तोडांवर जामीन मंजूर झाल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
काय आहे प्रकरण
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे आणले होते. त्याला देशातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता. पंजाब, हरिणाया, उत्तर प्रदेशातील अनेक शेतकरी केंद्र सरकारविरोधात दिल्लीच्या अनेक सीमांवर आंदोलन करत होती. याचदरम्यान युपीतील काही आंदोलक शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्याविरोधात आंदोलन काढले होते. शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजपविरोधी घोषणा देत होते. त्याचे राग अगावर झाल्याने मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आरोपी आशिषने मित्रांच्या साहाय्याने कट रचून शेतकऱ्यांनी गाडी खाली चिरडले होते. तपासात ही माहिती समोर आली होती.