आरोग्य खात्याच्या भरतीत अडथळे: जानेवारीमध्ये होणार होती भरती; आता 20 दिवसानंतर सुरू होईल प्रक्रिया


अमरावती8 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नियमित 600 आणि सुमारे 200 कंत्राटी अधिकारी – कर्मचाऱ्यांची भरती करावयाची आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार भरतीची प्रक्रिया या महिन्यात (जानेवारी) सुरू करण्यात येणार होती. त्यासाठीची संपूर्ण प्रशासकीय तयारी देखील झाली होती. परंतु विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता आणि ज्या कंपनीमार्फत या भरतीची ऑनलाईन प्रक्रिया राबवायची आहे, त्या कंपनीकडे उपलब्ध नसलेल्या पायाभूत सुविधा या दोन अडथळ्यांमुळे ती अडली आहे.

Advertisement

विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता आगामी 4 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे आतापासून किमान 20 दिवसानंतरच भरतीची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अमरावती जिल्ह्यात वेगवेगळ्या आजारांचे निदान करणारे तज्ज्ञ डॉक्टर्स, सहायक डॉक्टर्स, औषधी निर्माते, परिचारिका (जीएनएम व एएनएम), बहुविध कार्यकर्ते (एमपीडब्ल्यू), कक्षसेवक, रुग्णसेवक, समुपदेशक अशा सुमारे 800 जागा भरावयाच्या आहेत.

तसेच पदभरतीसाठी आरोग्य विभागाने शासनाने नेमून दिलेल्या टाटा कन्सल्टंसी सर्विसेस (टीसीएस) या ऑनलाईन कंपनीसोबत कराराची प्रक्रियादेखील सुरू केली. परंतु सदर कंपनीकडे हव्या त्या प्रमाणात पायाभूत सुविधा नाहीत. गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता या भरती प्रक्रियेत सुमारे 50 हजार उमेदवार सहभागी होतील, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. परंतु एवढ्या उमेदवारांसाठी आवश्यक असलेली परीक्षा केंद्रे टीसीएसकडे उपलब्ध नाहीत. शिवाय टीसीएसने भरतीसाठीचा प्रति उमेदवार सांगितलेला खर्चही एमपीएससीच्या तुलनेत तिप्पट महाग आहे. त्यामुळे ‘वेट अँड वॉच’ सुरू आहे.

Advertisement

अमरावती जिल्ह्यातील रिक्त जागांसह राज्यभरातील रिक्त जागांच्या भरतीसाठी गेल्या दीड वर्षांपूर्वी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. परंतु पेपरफूट प्रकरणामुळे शासनाने ती भरती नंतर रद्द केली. त्यानंतर सरकारची अस्थिरता, नंतरच्या काळातील सत्ताबदल, मंत्रिमंडळाच्या गठनात झालेला विलंब अशा वेगवेगळ्या स्थित्यंतरामुळे ही भरती रखडली. आता कुठे या भरतीचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु दरम्यानच्या काळात घोषित झालेली विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता मोठा अडसर बनली आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement