आरोग्यवार्ता: ‘आयएमए’च्या डॉक्टरांकडून बस स्थानकावर प्रवाशांची तपासणी; 25 टक्के व्यक्तींना BP वाढल्याचे माहितच नाही


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • World Hypertension Day​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​ Dr. Bhagwat Karad | Aurangabad News

औरंगाबाद3 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

‘आयएमए’च्या डॉक्टरांकडून केलेल्या तपासणीत 25 टक्के व्यक्तींना BP वाढल्याचे माहितच नाही, ही गंभीर बाबही समोर आली. जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शहर शाखेतर्फे – सेंट्रल बस स्टँड येथे या रक्तदाब तपासणी शिबिरचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

डॉ. यशवंत गाडे यांच्या संकल्पनेतून हे तपासणी शिबीर घेण्यात आले. यात आयएमए सचिव डॉ. अनुपम टाकळकर यांच्या नियोजनातून हे तपासणी शिबिर यशस्वीपणे पार पडले. या शिबिरात 148 लोकांना तपासण्यात आले त्यापैकी 37 लोकांना उच्च रक्तदाब असल्याचे निष्पन्न झाले. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी एकालाही आपल्याला उच्च रक्तदाब असल्याची माहितीच नव्हती, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्याची माहिती डॉ. अनुपम टाकळकर यांनी दिली.

उच्च रक्तदाब सायलेंट किलर

Advertisement

उच्च रक्तदाब हा सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो. उच्च रक्तदाबाचा आपल्या शरीरावर हळूहळू विपरीत परिणाम होऊ लागतो. बऱ्याच व्यक्तींना आपल्याला उच्च रक्तदाब आहे, हे माहिती देखील नसते. या कॅम्पचा उद्देश्य सर्वसामान्य जनतेमध्ये ब्लडप्रेशर विषयी जनजागृती करणे, जेणेकरून ब्लडप्रेशरचा आजार वेळीच ओळखून तो आटोक्यात आणण्यासाठी जीवनशैलीत बदल आणि गोळ्या औषधे यांचा उपचार करून होणारे संभाव्य धोके त्यांना टाळता येतील.

25 टक्के लोकांना माहितीच नव्हती

Advertisement

शिबिराबाबत माहिती देताना डॉ. अनुपम टाकळकर म्हणाले की, या कॅम्पमध्ये साधारणतः 25% व्यक्तींचे ब्लड प्रेशर हे धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त होते. यापैकी बहुतांश व्यक्तींना आपल्याला ब्लडप्रेशरचा काही त्रास आहे हे ठाऊक देखील नव्हते. या व्यक्तींनी आपले ब्लड प्रेशर कधीही तपासले नव्हते. अध्यक्ष डॉ. यशवंत गाडे यांनी सांगितले की, रक्तदाब नियंत्रणासाठी आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. ताण तणाव व चिंतामुक्त जीवन जगणे हे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी गुरुमंत्रच आहे.

रोज 25 मिनिटे करा व्यायाम

Advertisement

डॉ. अनुपम टाकळकर यांनी सांगितले की, दिवसातून रोज 45 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. आहारामध्ये तळीव पदार्थांचा समावेश कमीत कमी ठेवावा. प्रोसेस्ड फूड खाणे टाळावे. जेवणात मिठाचा वापर कमी करावा. डॉक्टर उज्ज्वला झंवर आणि डॉक्टर योगेश लक्कस यांनी तपासणी दरम्यान ज्या व्यक्तींचा रक्तदाब हा जास्त आलेला आहे त्यांना तपासून त्यांच्यावर उपचार सुरू केले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी आयएमए महिला विंगच्या अध्यक्षा डॉ. उज्वला झंवर, डॉ. योगेश लक्कस, डॉ. सुनील गोविंदराव पाटील, डॉ. बाबासाहेब उनवणे, डॉ. सतीश कुमार शेळके, डॉ मयांक आणि डॉ शेख यांनी विशेष प्रयत्न केले. याप्रसंगी ॲम्बुलन्स व्यवस्था गजानन हॉस्पिटल यांच्यातर्फे करण्यात आली होती.

Advertisement



Source link

Advertisement