आरोग्यरत्न पुरस्काराने गौरव: हिंगोली आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रशांत तुपकरी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार


प्रतिनिधी | हिंगोली11 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी यांना राज्य शासनाचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार सोमवारी (ता. २३) सायंकाळी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Advertisement

हिंगोली आरोग्य विभागात कार्यरत असलेले तुपकरी यांनी विस्तार व माध्यम अधिकारी म्हणून काम करताना राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांबाबत गावपातळीवर जनजागृती केली. या शिवाय उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यामध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत जनजागृती चालवली आहे.

साथरोगाच्या काळात गावांमधे जाऊन अबेटींग करणे, किटक सर्वेक्षणाचे कामही त्यांनी केले आहे. कोविडच्या काळातही त्यांनी जनजागृतीच्या कामासोबतच प्रत्यक्ष गावपातळीवर जाऊन गावकऱ्यांच्या आरोग्य तपासणीमध्ये सहभाग घेतला. विशेष म्हणजे कोविडची लागण झाल्यानंतरही त्यांनी उपचार घेऊन पुन्हा कामावर रुजू झाले अन आरोग्य विषयक कामे सुरुच ठेवली होती.

Advertisement

दरम्यान, त्यांच्या या कार्याची दखल घेत आरोग्य विभागाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कारासाठी त्यांची निवड केली. मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तुपकरी यांनी पुरस्कार देण्यात आला. यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, आशिष शेलार यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह सुलोचनाबाई तुपकरी, गितांजली तुपकरी, प्रथमेश तुपकरी, रुद्रायनी तुपकरी यांची उपस्थिती होती. राज्यातील १० जणांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement