देवळाली कॅम्प एका तासापूर्वी
- कॉपी लिंक
येथील शंकर एज्युकेशन सोसायटीच्या ७५ व्या वर्धापन दिन व सुभाषचंद्र बोस जयंतीच्या निमित्ताने डॉ. गुजर सुभाष हायस्कूलमध्ये ‘सुभाष रन’चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ११, १५ व १९ वर्षांच्या आतील मुले, मुली आणि सर्व वयोगटातील पालकवर्ग यांनी सहभाग घेतला. एकूण १३०० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. याप्रसंगी निर्भया पथक नाशिकच्या पोलिस नाईक अश्विनी देवरे-शेवाळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. संस्थेचे कार्याध्यक्ष नवीन गुरनानी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. परिचय स्नेहलता अहिरराव यांनी दिला. पंचक्रोशीतील १३ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील १३०० विद्यार्थ्यांव्यतिरिक्त पालकांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना व पालकांना सुवर्णपदक , रौप्यपदक , कांस्यपदक संस्थेच्या वतीने प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी निरोगी शारीरिक स्वास्थ्यासाठी धावण्याचे महत्व संस्थेचे सचिव रतन चावला यांनी सांगितले.
११ वर्ष आतील मुले : प्रथम क्र. : भावेश परदेशी (प्राथमिक शाळा, शिंगवे बहुला), द्वितीय :रुद्र पटेल ( बार्न्स स्कुल), तृतीय : कृष्णा गाडे (देवळाली हायस्कुल) ११ वर्षाच्या आतील मुली : प्रथम क्र. : पूजा शिंदे व वासुदेव अथनी, द्वितीय : नंदिनी चौधरी (नूतन विद्यामंदिर), तृतीय : अनन्या शर्मा (डॉ. गुजर हायस्कूल) १५ वर्षाच्या आतील मुले प्रथम क्र. : मो. गुलाम नबी मो. घोषी (डॉ. गुजर सुभाष हायस्कूल), द्वितीय : प्रनिल काळे, देवळाली हायस्कूल, तृतीय : राजेश पांडे (आर्मी पब्लिक स्कूल) १५ वर्षाच्या आतील मुली प्रथम क्र. सिद्धिका पाटील (देवळाली हायस्कुल), द्वितीय : तनिष्का साळवे (कॅन्टोमेंट बोर्ड हायस्कूल), तृतीय : शरयू कासार (डॉ. गुजर सुभाष हायस्कुल)१९ वर्षे आतील मुले : प्रथम क्र. म्रिगनक महादेवन (बार्न्स स्कूल), द्वितीय : विशाल दळवी (नूतन ), तृतीय : सूरज दळवी (पांढुर्ली)१९ वर्षे आतील मुली : प्रथम क्र. सनफिदा नॉनग्रम (बार्न्स स्कूल), द्वितीय : स्नेहा चौहान, तृतीय : संजना वारुंगसे (डॉ. गुजर सुभाष हायस्कूल).