आरसीबीचा कर्णधार फाफ ड्यू प्सेसिसच्या एका निर्णयामुळे त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी केली जातेय

आरसीबीचा कर्णधार फाफ ड्यू प्सेसिसच्या एका निर्णयामुळे त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी केली जातेय
आरसीबीचा कर्णधार फाफ ड्यू प्सेसिसच्या एका निर्णयामुळे त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी केली जातेय

आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये अखेर रॉयल चॅलेंजर बंगळूरूने वियजाचं खातं उघडलं. केकेआर विरूद्ध झालेल्या सामन्यात ३ गडी राखून विजय मिळवला. स्लो स्कोरिंगवर रखडलेला हा सामना अखेर दिनेश कार्तिकने एक चौकार आणि सिक्स मारत जिंकून दिला. मात्र या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ ड्यू प्सेसिसच्या एका निर्णयामुळे त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी केली जातेय.

या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वांसमोर स्वतःची खिल्ली उडवून घेतली. क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट रिव्ह्यू त्याने घेतला. फाफ डू प्लेसिसच्या निर्णयाची सोशल मीडियावर चेष्टा करण्यात येतेय. यानंतर एका यूजरने , त्याच्यावर संपूर्ण सीझनसाठी बंदी घालण्यात यावी, असं सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.

Advertisement

कोलकात्याच्या डावात १६व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ही घटना घडली. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर वरुण चक्रवर्तीने योग्य पद्धतीने बचाव केला. बॉल त्याच्या बॅटच्या मधोमध आदळला. यावेळी गोलंदाज हर्षलला वाटलं की, चेंडू पहिल्या पॅडला लागला. त्याने अपील केलं, जे अंपायरने फेटाळलं. याचवरून डु प्लेसिसने डीआरएस घेतला.

वनिंदू हसरंगाने २० धावांत ४ विकेट्स घेतल्या. आकाश दीपने दोन, हर्षल पटेल दोन व मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली. डेव्हिड विलीनेही टिच्चून मारा केला आणि कोलकाताचा संघ १८.५ षटकांत १२८ धावांत तंबूत परतला. कोलकाताकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक २५ धावा केल्या, तर उमेश यादव व वरुण चक्रवर्थी यांची १०व्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी ही सर्वोत्तम ठरली. कोलकाताच्या डावातील १६व्या षटकात हर्षलच्या गोलंदाजीवर वरुण चक्रवर्थीसाठी पायचीत चे जोरदार अपील झाले. हर्षलने भन्नाट यॉर्कर टाकला होता, परंतु मैदनावरील अम्पायरने नाबाद दिला आणि फॅफने DRS घेतला. पण, रिप्लेत चेंडू पॅडला नव्हे तर बॅटला लागल्याचे समोर आले आणि मीम्सचा पाऊस पडला.

Advertisement

सोशल मीडियावर एका यूजरने लिहिलंय की, हा डीआरएस घेतल्यानंतर फाफ डू प्लेसिसवर संपूर्ण सिझनसाठी बंदी घालण्यात यावी. तर दुसर्‍या यूजरने म्हटलंय की, RCB DRSचा वापर अशी करतेय जसं मी माझ्या वडिलांचे पैसे वापरतो.

Advertisement