आयसीसीच्या अध्यक्षांना आयपीएलचे चाहते असूनही वाटते आहे जागतिक क्रिकेटची चिंता

आयसीसीच्या अध्यक्षांना आयपीएलचे चाहते असूनही वाटते आहे जागतिक क्रिकेटची चिंता
आयसीसीच्या अध्यक्षांना आयपीएलचे चाहते असूनही वाटते आहे जागतिक क्रिकेटची चिंता

इंडियन प्रीमियर लीग, या जगप्रसिद्ध टी२० लीगचे चाहते जगभरात आहेत. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल अर्थात आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले हे देखील आयपीएलचे मोठे प्रशंसक आहेत. परंतु आयपीएलच्या वाढत्या अवधीमुळे आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिकांची संख्या कमी होऊ शकतात, असे मत त्यांनी मांडले आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात २ नवे संघ सहभागी झाल्याने सामन्यांची संख्या वाढली आहे. मागील हंगामात ६० सामन्यांची झालेली ही आयपीएल यावेळी ७४ सामन्यांची झाली आहे.

वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना बार्कले (ICC President Greg Barclay) यांनी नानाविध प्रश्नांची उत्तरे दिली आहे. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये (International Bilateral Series) संतुलन कसे राखले जाते, या प्रश्नाचे उत्तर देताना बार्कले म्हणाले की, “आयपीएल आणि अशा इतर काही देशांतर्गत लीगचे सामने वाढण्याबरोबरच आणखी काही नवीन लीगही सुरू होतील. परंतु अशा देशांतर्गत स्पर्धा सदस्य राष्ट्रांच्या अधिकार क्षेत्रात असतात. ते त्यांना हवे तसे या स्पर्धा चालवू शकतात. परंतु या स्पर्धांचा कालावधी वाढला म्हणजे आंतरराष्ट्रीय संघांमधील द्विपक्षीय सामने कमी होतील. एका वर्षात फक्त ३६५ दिवस असतात, त्यामुळे या गोष्टींचे व्यवस्थापन करणे कठीण बनते.”

Advertisement

पुढे आयपीएलची प्रशंसा करताना बार्कले म्हणाले की, “त्यांना ही लीग खूप आवडते. मी २ वर्षे प्रवास करण्यास सक्षम नव्हतो. परंतु भारतात परत येऊन चांगले वाटले. आयपीएलसाठी भारतात येण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. मला आयपीएल आवडते. ही एक शानदार क्रिकेट स्पर्धा आहे. मला वाटते की, भारत आणि बीसीसीआयने क्रिकेटसोबत अद्भुत प्रयोग केला आहे. ही एक अशी स्पर्धा, जिला पाहणे आणि तिचा भाग बनणे सन्मानाची गोष्ट आहे.”

२०२४-२०३१ साठी आयपीएलचे मीडिया अधिकार जारी झाल्यानंतर मीडिया हक्क निविदा काढल्या जातील, अशी माहितीही बार्कलेंनी दिली. “मी खरोखरच उत्साहित आहे की, अनेकांना मीडिया अधिकारांमध्ये खूप रस आहे. मला वाटते की काही अत्यंत विश्वासार्ह पार्टी आहेत, ज्या आयसीसीसोबत काम करण्यास सक्षम असतील आणि ते सर्व क्रिकेटच्या विकासात सकारात्मक योगदान देऊ शकतील,” असेही त्यांनी म्हटले.

Advertisement