आयपीएल २०२२ मध्ये नवा संघ विजयी होईल की राजस्थान १४ वर्षांनी करेल स्वप्न पूर्ण…

आयपीएल २०२२ मध्ये नवा संघ विजयी होईल की राजस्थान १४ वर्षांनी करेल स्वप्न पूर्ण...
आयपीएल २०२२ मध्ये नवा संघ विजयी होईल की राजस्थान १४ वर्षांनी करेल स्वप्न पूर्ण...

आयपीएल २०२२ची फायनल गुजरात आणि राजस्थान यांच्यात होणार आहे. ही लढत आज २९ मे रोजी रात्री ८ वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. आयपीएलचे विजेतेपद मिळवण्यासाठी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज(२९ मे) लढत होणार आहे. १५ वर्षापूर्वी आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्सला पुन्हा एकदा इतिहास घडवण्याची संधी आहे.

दुसऱ्या बाजूला दिग्गजांचा पराभव करत प्रथमच लीगमध्ये खेळणाऱ्या गुजरात टायटन्सला नवा इतिहास घडवण्याची संधी आहे. दोन महिन्यांपूर्वी आयपीएलचा १५वा हंगाम सुरू झाला तेव्हा कोणी विचार देखील केला नसेल की अंतिम सामन्यात नाणेफेकीसाठी संजू सॅमसन आणि हार्दिक पंड्या हे दोन खेळाडू मैदानावर उतरतील. गेल्या काही महिन्यात करिअरमधील चढ-उतार पाहिलेल्या हार्दिक पंड्या आणि आशीष नेहरा यांनी दोन महिन्यात गुजरात संघाला अव्वल स्थानी पोहोचवले.

Advertisement

आयपीएलच्या मेगा लिलावानंतर गुजरात संघावर मॅच खेळण्याआधीच पराभव झालेला संघ अशी टीका करण्यात आली होती. पण या संघाने मैदानावरील कामगिरीने सर्वांना चोख उत्तर दिले. वन मॅच वंडर असे म्हटले जाणाऱ्या राहुल तेवतिया आणि सासत्याने चांगली कामगिरी करणारा डेव्हिड मिलर सारख्या खेळाडूंचा हा संघ कागदावर मजबूत वाटत नव्हता. पण क्रिकेट सारख्या अनिश्चिततेच्या खेळात या खेळाडूंनी कमाल करून दाखवली. फॉर्ममध्ये परतलेल्या हार्दिकने कर्णधारपदाचा दबाव न घेता फलंदाजी केली. दुसऱ्या बाजूला पाच वर्ष लय मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या मिलरने सर्वांना धक्का दिला. तेवतियाने देखील दाखवून दिले की शाहजाहमध्ये मारलेले पाच षटकार हे मटका नव्हते.

राशिद खानने त्याच्या भात्यात नवे डावपेच ठेवले आहेत. तर ऋद्धिमान साहाने अजून एक हंगाम खेळण्याचे निश्चित केलय. गुजरात कधीच क्रिकेटसाठी प्रसिद्ध नव्हे. येथील पार्थिव पटेल आणि जसप्रीत बुमराह सारखे खेळाडू भारतीय संघात खेळले पण आता चेन्नई सुपर किंग्ज प्रमाणे गुजरातमधील क्रिकेटची क्रेझ झाली आहे. अंतिम सामन्यात घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा गुजरातला होऊ शकतो.

Advertisement

प्रतिस्पर्धी असलेला राजस्थानचा संघ कमी नाही. आयपीएलचे पहिले विजेतेपद त्यांनी वॉर्नच्या नेतृत्वाखाली मिळवले होते. त्यानंतर ते प्रथमच अंतिम फेरीत पोहोचले आहेत. संजू आणि हार्दिक पंड्या यांच्या क्षमता सारखीच आहे. संजू अशा काही खेळाडूंपैकी आहे ज्याने भारतासाठी अद्याप एकही टी-२० मॅच खेळली नाही. पण त्याची लोकप्रियता अधिक आहे. आता कर्णधारपद आणि मिळालेल्या यशामुळे त्याचा आत्मविश्वास वाढलाय. संजूकडे आर अश्विन, युजवेंद्र चहल, जोस बटलर, ट्रेंट बोल्ड सारखे दिग्गज तर यशस्वी जयसवाल आणि प्रसिद्ध कृष्णा सारखे युवा खेळाडू आहेत. संजूने या सर्वांना सोबत घेत संघाला इथपर्यंत आणले आहे. उद्या होणाऱ्या फायनल सामन्यात नवे हिरो देखील होतील आणि अनेक विक्रम देखील तयार होतील.

Advertisement