आयपीएल २०२२ च्या लिलावात सगळ्या संघांना खूप मोठी चूक आली लक्षात; कुलदीप यादव

आयपीएल २०२२ च्या लिलावात सगळ्या संघांना खूप मोठी चूक आली लक्षात; कुलदीप यादव
आयपीएल २०२२ च्या लिलावात सगळ्या संघांना खूप मोठी चूक आली लक्षात; कुलदीप यादव

२०१९च्या वनडे वर्ल्डकपच्या आधीपासून भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव बद्दल वेगवेगळ्या चर्चा व्हायच्या. संघ व्यवस्थापनाचा त्याच्यावरील विश्वास कमी होत होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नाही तर आपीएलमध्ये त्याला कोलकाता नाईट रायडर्सने सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांच्या शिवाय एक अतिरिक्त पर्यायी गोलंदाजी म्हणून पाहिले. या साऱ्या अपमानाचा बदला कुलदीपने काल रविवारी झालेल्या सामन्यात घेतला. एका मुलाखतीत कुलदीप यादवने त्याच्या मनातील वेदना बोलून दाखवल्या होत्या. जेव्हा भारतीय संघात निवड होत नाही तेव्हा तुमच्याशी बोलले जाते. पण आयपीएलमध्ये तसे होत नाही. केकेआरला माझ्यावर विश्वास राहिला नाही.

कुलदीप यादवला भलेही माहिती नसेल की त्याची चुक काय होती पण काल १० मार्च रोजी झालेल्या सामन्यात केकेआरला मात्र त्यांची चूक लक्षात आली. ज्या गोलंदाजाला किरकोळ समजण्याची चूक केली तोच केकेआरवर भारी पडला. सामना केकेआर आणि दिल्ली यांच्यात झाला असला तरी ही लढत कुलदीपच्या आत्मसन्मानाची होती. कारण तो त्याच्याच जुन्या संघाविरुद्ध खेळत होता. ज्या संघाने त्याला काही महिन्यांपूर्वी चुकीच्या पद्धतीने बाहेरचा रस्ता दाखवला होता. आयपीएलमधील गेले काही महिने कुलदीपसाठी वाईट स्वप्नासारखे होते. एकेकाळी केकेआरच्या गोलंदाजी विभागाची शान असलेल्या कुलदीपला फक्त मैदानात पाणी देण्याचे काम दिले गेले. अंतिम ११ मध्ये वरुण चक्रवर्तीला प्राधान्य दिले जात. त्याआधी तो भारतीय संघातून बाहेर पडला होता. मेगा लिलावात केकेआरने त्याला रिटने केले नाही. मात्र दिल्लीने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि २ कोटींना खरेदी केले. रविवारी झालेल्या सामन्यात कुलदीपने फिरकीची कमाल दाखवली. केकेआर १७१ वर ऑलआउट झाले आणि दिल्लीने ४४ धावांनी विजय मिळवला.

Advertisement

कुलदीपने केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरला बाद करून मोठी विकेट मिळवून दिली. केकेआरची सुरुवात खराब झाली होती. पण अय्यर आणि नितीश राणा यांनी डाव सावरला होता. ११ षटकात १०१ धावा करणाऱ्या केकेआरला ११५ धावांची गरज होती. त्यामुळे अय्यरची विकेट महत्त्वाची ठरली. त्यानंतर १६व्या षटकात त्याने ३ विकेट घेत केकेआरचे कंबरडे मोडले. तिसऱ्या चेंडूवर पॅट कमिंन्स, पाचव्या चेंडूवर सुनील नरेन तर अखेरच्या चेंडूवर उमेश यादवला बाद केले.

Advertisement

आयपीएलमध्ये कुलदीपने २०१२ साली मुंबई इंडियन्सपासून सुरूवात केली होती. पण त्याला खरी ओळख केकेआरमध्ये असताना मिळाली. २०१४ साली तो संघात आला असला तरी पदार्पणासाठी दोन वर्ष वाट पाहावी लागली. २०१६ साली त्याने पहिला मॅच खेळली. २०१८ मध्ये त्याने १७ विकेट घेतल्या होत्या.

आयपीएल २०२२मधील कुलदीपची कामगिरी

Advertisement

मुंबईविरुद्ध १८ धावात ३ विकेट

गुजरातविरुद्ध ३२ धावात १ विकेट

Advertisement

लखनौविरुद्ध ३१ धावात २ विकेट

कोलकाताविरुद्ध ३५ धावात ४ विकेट

Advertisement