आयपीएल २०२२ ची सर्वात खराब अंतिम संघाचा उपकर्णधारपदी रोहित शर्माची निवड; कोण आहेत अजून त्यात वाचा…

आयपीएल २०२२ ची सर्वात खराब अंतिम संघाचा उपकर्णधारपदी रोहित शर्माची निवड; कोण आहेत अजून त्यात वाचा...
आयपीएल २०२२ ची सर्वात खराब अंतिम संघाचा उपकर्णधारपदी रोहित शर्माची निवड; कोण आहेत अजून त्यात वाचा...

आयपीएल २०२२ चे साखळी फेरीचे सामने शेवटच्या टप्प्यात आले आहेत. अशात प्लेऑफचे चित्रही हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहेत. राजस्थान, हैदराबाद, गुजरात आणि लखनऊ हे संघ प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या टी-२० लीगमध्ये काही युवा खेळाडू चमकले, ज्यांना भविष्यात भारतीय संघात देखील स्थान मिळू शकते. तर दुसरीकडे काही अनुभवी दिग्गज खेळीडू मात्र अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाहीत. आपण या लेखात ११ खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन बनवली आहे, ज्यांनी आयपीएल २०२२ मध्ये कमीत कमी पाच सामने खेळले, पण खूपच निराशाजनक प्रदर्शन केले.

आयपीएल २०२२ मध्ये अपयशी ठरलेली प्लेइंग इलेव्हन –

Advertisement

अजिंक्य रहाणे-

कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर फलंदाज अजिंक्य रहाणे आयपीएल २०२२ मध्ये पूर्णपणे अपयशी ठरला आहे. हंगामात खेळलेल्या ५ सामन्यांमध्ये त्याने १६ च्या सरासरीने आणि १०० च्या स्ट्राइक रेटने ८० धावा केल्या. त्याने या पाच डावांमध्ये ८० चेंडू खेळले आणि तेवढ्याच धावा केल्या. या प्रदर्शनानंतर रहाणेला संघातून वगळले गेले.

Advertisement

रोहित शर्मा (उपकर्णधार)-

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासाठी देखील हा हंगाम खूप निराशाजनक राहिला आहे. त्याने या हंगामात १७.२२ च्या सरासरीने आणि १२३ च्या स्ट्राइक रेटसह १५५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक निघाले नाही. त्याच्या खराब प्रदर्शाचा परिणाम मुंबई इंडियन्सवर देखील पडला आणि संघ गुणतालिकेत सर्वात तळात आहे. याच कारणास्तव आयपीएल २०२२ च्या अपयशी प्लेइंग इलेव्हनचा रोहित शर्मा उपकर्णधार नक्कीच बनू शकतो.

Advertisement

विराट कोहली-

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली, सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्ममधून जात आहे. त्याने आयपीएल २०२२ मध्ये खेळलेल्या ११ डावांमध्ये २१.६० च्या सरासरीने २१६ धावा केल्या आहेत. हंगामात तो अतापर्यंत केवळ एक अर्धशतक करू शकला आहे.

Advertisement

जॉनी बेयरस्टो-

इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्जच्या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही. हंगामात त्याने खेळलेल्या सात सामन्यांमध्ये अवघ्या ८० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ११.४३ आणि स्ट्राइक रेट १०५.२६ चा होता. विशेष बाब म्हणजे चालू हंगामात त्याने अजून एकही षटकार मारलेला नाहीये.

Advertisement

रोवमन पॉवेल-

वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज रोवमन पॉवेल देखील आयपीएलच्या या १५ व्या हंगामात चांगले प्रदर्शन करू शकला नाही. त्याने खेळलेल्या ९ सामन्यात १९.२९ च्या सरासरीने आणि १६२ च्या स्ट्राइक रेटने १३५ धावा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सला त्याच्याकडून यापेक्षा खूप चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती.

Advertisement

रवींद्र जडेजा-

रवींद्र जडेजा या हंगामात सीएसकेचा कर्णधार बनला होता, पण त्याला हा दबाव पेलता आला नाही आणि त्याने या पदावरून माघार घेतली. जडेजाने चालू हंगामातील १० डावांमध्ये १९.३३ च्या सरासरीने आणि ११८.३६ च्या स्ट्राइक रेटने ११६ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत त्याने ३३ षटकांमध्ये २४८ धावा खर्च केल्या आणि ५ विकेट्स घेतल्या.

Advertisement

एमएस धोनी (कर्णधार)-

चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने हंगामात एका सामन्यात संघाला विजय मिळवून दिला, पण इतर सामन्यात मात्र तो अपयशी ठरला आहे. हंगामात खेळलेल्या १० सामन्यांमध्ये धोनीने २८.४० च्या सरासरीने आणि १३० च्या स्ट्राइक रेटने १४२ धावा केल्या आहेत.

Advertisement

वरुण चक्रवर्ती-

कोलकाता संघाला अद्याप प्लेऑफमध्ये स्थान पक्के न करता येण्यामागचे महत्वाचे कारण आहे, त्यांचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती. त्याने हंगामातील ८ सामन्यात अवघ्या ४ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने ८.८२ च्या इकोनॉमीने धावा खर्च केल्या आहेत.

Advertisement

जसप्रीत बुमराह-

भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. आयपीएल २०२२ मध्ये त्याचे प्रदर्शन खूपच साधारण आहे. ९ सामन्यांमध्ये त्याने अवघ्या ५ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची इकोनॉमी ७.४५ राहिली आहे. मुंबई इंडियन्सच्या अपयशात जसप्रीत बुमराहचा मोठा वाटा आहे.

Advertisement

मोहम्मद सिराज –

आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ११ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आहेत, पण यादरम्यान त्याने ९.४७ च्या इकोनॉमीने धावा खर्च केल्या आहेत. सिराज हंगामात आरसीबीसाठी खूपच महागात पडला आहे. आरसीबीने या हंगामासाठी त्याला रिटने केले होते, पण तो अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही.

Advertisement

ड्वेन प्रिटोरियस-

सीएसकेचा वेगवान गोलंदाज ड्वेन प्रिटोरियस देखील चांगले प्रदर्शन करू शकला नाहीये. त्याने खेळलेल्या ६ सामन्यांमध्ये ६ विकेट्स घेतल्या आहे. परंतु यादरम्यान त्याने तब्बल १० च्या इकोनॉमीने धावा खर्च केल्यामुळे संघाला खूप महागात पडला आहे.

Advertisement

आईपीएल २०२२ मध्ये अपयशी ठरलेली प्लेइंग इलेव्हन –

अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा (उपकर्णधार), विराट कोहली, जॉनी बेयरस्टो, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा,एमएस धोनी (कर्णधार),वरुण चक्रवर्ती,जसप्रीत बुमराह,मोहम्मद सिराज, क्रिस जॉर्डन.

Advertisement