आयपीएल मधून धोनीच्या निवृतीवरून गावसकरांचे मोठे विधान; म्हणाले…

आयपीएल मधून धोनीच्या निवृतीवरून गावसकरांचे मोठे विधान; म्हणाले...
आयपीएल मधून धोनीच्या निवृतीवरून गावसकरांचे मोठे विधान; म्हणाले...

चेन्नई सुपर किंग्स संघाला आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखले जाते. मात्र, यंदाचा १५वा आयपीएल हंगाम त्यांच्या पचनी पडला नाही. चेन्नईच्या नावावर या हंगामात अनेक नकोसे विक्रम झाले. चेन्नईला गुरुवारी आयपीएल २०२२मधील ५९व्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला ५ विकेट्सने पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या सामन्यानंतर चेन्नईचा प्लेऑफचा प्रवास संपला. यामुळे चेन्नई आयपीएल २०२२मधून बाहेर होणारा दुसरा संघ बनला आहे. अशात आता पुन्हा एकदा चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशात भारतीय संघाचे माजी सलामीवीर फलंदाज सुनील गावसकर यांनी धोनीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

धोनीच्या भविष्याबाबत सांगितली ही गोष्ट

Advertisement

एमएस धोनी याच्या निवृत्तीबाबत माध्यमांशी बोलताना सुनील गावसकर म्हणाले की, धोनी खेळाबाबत उत्साहित दिसतोय. अशात हे स्पष्ट आहे की, तो आयपीएलच्या पुढच्या हंगामातही सहभागी होईल. पुढे बोलताना गावसकर म्हणाले की, “तो मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध कसा खेळला हे पाहावे लागेल. खेळाबाबत तो खूप उत्सुक असल्याचे त्याच्या फलंदाजीवरून स्पष्ट होते. तो मैदानावरही चांगला दिसत आहे. तो एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत धावत आहेत.

अशा स्थितीत तो अजूनही खेळाबाबत उत्सुक असल्याचे स्पष्ट झाले आहे. लवकर फलंदाजी करण्याची संधी म्हणून तो याकडे पाहत आहे. या हंगामात तो सातत्याने हे काम करत आहे. म्हणजेच या हंगामानंतरही तो निवृत्त होणार नाही. होय, तो खेळत राहील. जसे त्याने २०२० नंतर सांगितले होते.”

Advertisement

एकट्याच्या जीवावर संघाला लाजीरवाण्या पराभवातून वाचवले

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाचे फलंदाज खास काही करू शकले नव्हते. यादरम्यान अर्धा संघ तर ५० धावांवरच तंबूत परतला होता. यानंतर धोनीने एका बाजूने डाव सांभाळला आणि धावफलक हलता ठेवला होता. त्याने या सामन्यात फलंदाजी करताना ३३ चेंडूत नाबाद ३६ धावा चोपल्या. त्याच्या या खेळीमुळे चेन्नई संघ सर्वबाद होत ९७ धावा करू शकला होता.

Advertisement

आयपीएलमधील कामगिरी

आयपीएल २०२२मधील चेन्नई संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यांपैकी फक्त ४ सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच, उर्वरित ८ सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे ते गुणतालिकेत नवव्या स्थानी आहेत.

Advertisement