पाकिस्तानचा रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर पाकिस्तानी खेळाडू आयपीएल खेळत असल्याचे स्वप्न पाहत आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये यावर भाष्य करत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. तेव्हापासून पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमधून बॅन करण्यात आलं आहे. त्यामुळे अख्तर पाकिस्तानी खेळाडू आयपीएल खेळत असल्याचे स्वप्न पाहत आहे. त्याने याबद्दल भाष्यही केलं आहे.
२००८ चा अपवाद वगळला तर पाकिस्तानी खेळाडूंना इंडियन प्रीमिअर लीगमध्ये BCCI ने थारा दिला नाही. मुंबईवर झालेल्या दहशदवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंवर आयपीएलबंदी घातली गेली. आयपीएलला टक्कर देण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) पाकिस्तान सुपर लीग ( PSL) आणली. तरीही जगातील सर्वात यशस्वी लीगमध्ये अर्थात आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंचा जीव तुटतोय… अशात यंदाच्या आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू असते, तर ते कोणत्या संघाकडून खेळले असले, या प्रश्नावर माजी गोलंदाज शोएब अख्तर याने स्वप्नवत उत्तर दिले आहे.
आयपीएलच्या महाकुंभात १५ वा सीझन महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. अशातच एका मुलाखतीदरम्यान शोएब अख्तरला जर पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये खेळले तर ते कोणत्या संघाचा भाग असतील? असा सवाल करण्यात आला. या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना शोएब अख्तरने सर्वप्रथम, पाकिस्तानचा सर्वात अनुभवी फलंदाज शोएब मलिकबद्दल सांगितले. जर तो आयपीएलमध्ये खेळत असता तर तो लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळला असता. कारण नव्या फ्रेंचायजीकडून खेळण्यात मजा येते. लखनऊ फ्रेंचायजीने त्याला पैसेदेखील भरपुर दिले असते. कारण तो मिडल ऑर्डरमध्ये कमालीची खेळी खेळतो.
अझहर अलीला विचारले असता, तो गंमतीने म्हणाला की, तुम्ही अझहर अलीची आयपीएलमध्ये निवड केली असती का? तो पुढे म्हणाला की अझहर अली राजस्थान रॉयल्स संघाचा भाग झाला असता. तिथे त्याला सलामीवीर म्हणून खेळवण्यात आले असते. कारण तो कमी पैशात मिळेल. आसिफ अलीबद्दल शोएब अख्तर म्हणाला की, जर तो आयपीएल खेळत असता तर तो केकेआर संघात असता, कारण तो एक फ्लॅमब्वॉयंट खेळाडू आहे. त्याने आंद्रे रसेलसोबत चौकार आणि षटकार ठोकले असते.
मोहम्मद रिझवानबाबत भाष्य करताना अख्तर म्हणाला विराटने त्याची निवड आरसीबीसंघात केली असती. कारण विराटला मैदानात खुप चपळ खेळाडू आवडतात. तर बाबर आझम हा मुंबई इंडियन्सकडून खेळला असता. त्याच्यावर संघाने भरपुर पैसा खर्च केला असता. दुसरीकडे, शाहीन शाह आफ्रिदी दिल्ली कॅपिटल्सच्या संघात असता. असे अख्तरने यावेळी सांगितले.
Sportskeedaशी बोलताना शोएब अख्तरने निवडलेले खेळाडू व आयपीएल फ्रँचायझी
शोएब मलिक – लखनौ सुपर जायंट्स
अझर अली – राजस्थान रॉयल्स
आसीफ अली- कोलकाता नाईट रायडर्स
मोहम्मद रिझवान – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
बाबर आजम – मुंबई इंडियन्स
शाहिन शाह आफ्रिदी – दिल्ली कॅपिटल्स
तो म्हणाला, मोहम्मद रिझवान आयपीएलमध्ये खेळत असता, तर तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सदस्य असता. तो विराट कोहलीसारखा स्टार खेळाडू आहे. त्याने विराटसह ओपनिंग केली असती.