आयपीएल फायनलचे स्थळ बीसीसीआय कडून निश्चित; चाहत्यांसाठी खास पर्वणी

आयपीएल फायनलचे स्थळ बीसीसीआय कडून निश्चित; चाहत्यांसाठी खास पर्वणी
आयपीएल फायनलचे स्थळ बीसीसीआय कडून निश्चित; चाहत्यांसाठी खास पर्वणी

यावर्षी आयपीएलची फायनल नेमकी कुठे होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. पण बीसीसीआयने आता ही फायनल नेमकी कुठे होणार हे ठरवले आहे. त्याचबरोबर आता चाहत्यांसाठी त्यांनी एक गूड न्यूज दिली आहे. आयपीएलची फायनल २९ ने या दिवशी होणार असल्याचे सर्वांनाच माहिती होते. पण ही कुठे खेळवणार हे आता बीसीसीआयने ठरवले आहे.यावर्षी आयपीएलची फायनल ही २९ ने या दिवशी अहमदाबाद येथे खेळवण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर या फायनलसाठी चाहत्यांना आता आनंदाची बातमी देण्यात आली असून ही फायनल आता स्टेडियमच्या पूर्ण क्षमतेने पाहता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त चाहत्यांना स्टेडिमध्ये जाऊन ही फायनल पाहता येणार आहे. आयपीएलमधील पहिला प्ले-ऑफचा सामना हा आता २४ मे या दिवशी कोलकाता येथे होणार आहे.

त्याचबरोबर २६ मे या दिवशी पहिला एलिमिनेटरचा सामना कोलकाता येथेच खेळवला जाणार आहे. त्यानंतर २७ मे या दिवशी आयपीएलचा दुसरा प्ले ऑफचा सामना आणि त्यानंतर २९ मे या दिवशी आपीएलचा अंतिम सामना हा अहमदाबाद येथे खेळवण्यात येणार आहे.यावेळी वुमम्स चॅलेंजर स्पर्धेचेही आयोजन २४ ते २८ मे या कालावधीत करणयात येणार आहे. यावर्षीची आयपीएलची फायनल नेमकी कुठे होणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती. पण बीसीसीआयने आता आयपीएलच्या फाय़नलचे ठिकाण जाहीर केले आहे.

Advertisement

यापूर्वी आयपीएलच्या सामन्यांना स्टेडियमच्या २५ टक्के आसन क्षमता देण्यात आली होती. सध्या ५० टक्के आसन क्षमता देण्यात आलेली आहे. पण आता फायनलसाठी गुजरातचे नरेंद्र मोदी स्टेडियम हे पूर्णपणे भरलेले असेल. त्याचबरोबर कोलकाताच्या इडन गार्डन्स या ऐतिहासिक मैदानामध्येही आयपीएलचे दोन महत्वाचे सामने होणार आहेत. बीसीसीआयने यावेळी महिलांची स्पर्धा भरवण्याचा शब्द दिला होता आणि तो त्यांनी आता पाळलेला दिसत आहे.

कारण आता महिलांची चॅलेंजर्स स्पर्धा खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्यामुळे आता आयपीएलबरोबरच महिलांच्या स्पर्धेचाही थरार चाहत्यांना अनुभवता येणार आहे. अहमदाबाद येथे जगातील सर्वात मोठे स्टेडियम बांधण्यात आले आहे. त्यामुळे जर हे स्टेडियम आयपीएलच्या फायनलमध्ये पूर्ण भरले गेले तर तो एक अनोखा विश्वविक्रमही होऊ शकतो. त्यामुळे आता सर्वांनाच आयपीएलच्या फायनलची उत्सुकता लागलेली असेल.

Advertisement