आयपीएल गव्हर्निग कौन्सिलने आयपीएल हक्क विकत कमावले ५४ हजार कोटी रुपये

आयपीएल गव्हर्निग कौन्सिलने आयपीएल हक्क विकत कमावले ५४ हजार कोटी रुपये
आयपीएल गव्हर्निग कौन्सिलने आयपीएल हक्क विकत कमावले ५४ हजार कोटी रुपये

इंडियन प्रीमियर लीगचे मीडिया राईटस् विकून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बंबर कमाई करणार आहे. २०२३ ते २०२७ पर्यंतच्या पाच सत्रांचे राईट विकून बीसीसीआय सुमारे ७.२ बिलियन डॉलरची (सुमारे ५४ हजार कोटी) कमाई करू शकते. आतापर्यंत टीव्ही १८ वायकॉम, डिज्नी, सोनी, झी, अमेझॉन आणि आणखी एका कंपनीने यासंबंधीची कागदपत्रे खरेदी केली आहेत. असेही म्हटले जात आहे की, अमेरिकन कंपनी अ‍ॅपलही लवकरच कागदपत्रे खरेदी करू शकते.

मीडिया राईटसच्या बाबतीत पाच महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे…

Advertisement

मीडिया राईटस्चे टेंडर डाक्यूमेंटस १० मेपर्यंत खरेदी केले जाऊ शकतात. त्यानंतर एक महिन्यापर्यंत जमा केलेल्या डाक्यूमेंटसची छाननी करण्यात येईल. तसेच जूनच्या दुसर्‍या आठवड्यात लिलाव जिंकून मीडिया राईटस् मिळविणार्‍या कंपन्यांच्या नावांची घोषणा करण्यात येईल.

बीसीसीआय यावेळी मीडिया राईटस्ची चार वेगवेगळ्या बकेटस्चा लिलाव करणार आहे. पहिल्या बकेटमध्ये भारतीय उपखंडातील टीव्ही राईटस असतील. दुसर्‍या बकेटमध्ये डिजिटल राईटस् तर तिसर्‍या बकेटमध्ये १८ सामन्यांचा समावेश करण्यात आला आहे. या १८ सामन्यांमध्ये हंगामाचा पहिला सामना, आठवड्याअखेरीस होणारे डबल हेडरमध्ये सायंकाळचा सामना तसेच चार प्ले ऑफ सामन्यांचा समावेश आहे. चौथ्या बकेटमध्ये भारतीय उपखंडाबाहेरील प्रसारणाचे अधिकार असतील.

Advertisement

बीसीसीआयने वरील चार बकेटसाठी एकूण ३२,८९० कोटी रुपये इतकी बेस प्राईस निश्चित केली आहे. प्रत्येक सामन्याचे टेलिव्हीजन राईटस् ४९ कोटी रुपयांना निश्चित करण्यात आले आहेत. तर प्रत्येक सामन्याच्या डिजिटल राईटस्ची बेस प्राईस ३३ कोटी रुपये असतील. १८ सामन्यांच्या क्लस्टरमधील प्रत्येक सामन्याची बेस प्राईस १८ कोटी रुपये असेल. तर भारतीय उपखंडाबाहेर राईटस्साठी प्रत्येक सामन्याला 3 कोटी रुपये मोजावे लागतील. अशा प्रकारे एकूण रक्कम ३२,८९० कोटी रुपये इतकी होते. मात्र, बीसीसीआयला मीडिया राईटस् विकून ५४ हजार कोटी रुपये मिळतील, असा विश्वास आहे.

याशिवाय याच दिवशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) २०२३ ते २७ या काळासाठी आयपीएल मीडिया राईटस् टेंडर जारी करणार आहे. आयपीएल मीडिया राईटस् ही क्रिकेट जगतातील सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असून त्यासाठी दाव्यांची रक्कम यावेळी कोणती उंची गाठेल याची कल्पनासुध्दा करणे अवघड आहे. २०१७ मध्ये स्टार इंडियाने २०१८ ते २२ दरम्यानच्या टेलिव्हिजन व डिजिटल राईटसाठी तब्बल १६ हजार ३४७ १कोटी ५० लाखांची रक्कम मोजली होती. आता ही रक्कम २० हजार कोटींचाही आकडा ओलांडेल अशी शक्यता आहे. आता एकत्र येत असलेल्या सोनी व झी टीव्ही मिळून स्टार इंडियाला कडवी स्पर्धा देतील असा अंदाज आहे. त्यामुळे ह्यावेळची रक्कम डोळे विस्फारणारी असेल असे मानले जात आहे.

Advertisement