आयपीएल इतिहासातील असे तीन संघ ज्यांनी ११ विजेतपद मिळवले ते आहेत प्ले ऑफच्या बाहेर

आयपीएल इतिहासातील असे तीन संघ ज्यांनी ११ विजेतपद मिळवले ते आहेत प्ले ऑफच्या बाहेर
आयपीएल इतिहासातील असे तीन संघ ज्यांनी ११ विजेतपद मिळवले ते आहेत प्ले ऑफच्या बाहेर

आयपीएलचा १५वा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. गेल्या १४ हंगामातील ११ विजेतेपद मिळवणारे ३ संघ यावेळी प्लेऑफमधून बाहेर पडले आहेत. इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १५ वा सीझन अंतिम टप्प्यात आहे. सर्वांना आश्चर्याचा धक्का देत गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन नवीन फ्रँचायझी प्ले ऑफसाठी पात्र ठरल्या आहेत. तर पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स, चार वेळा विजेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्ज आणि दोन वेळा विजेता कोलकाता नाइट रायडर्स आयपीएल २०२२ मधून बाहेर पडले आहेत. बुधवारी रात्री लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध पराभवानंतर प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा कोलकाता हा तिसरा संघ ठरला. आयपीएलच्या इतिहासात मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यापैकी कोणताही संघ प्लेऑफमध्ये सहभागी नसण्याची ही पहिलीच वेळ असेल.

या तिन्ही संघांच्या कामगिरीवर एक नजर टाकूया-

Advertisement

मुंबई इंडियन्सचा सलग ८ पराभव झाला.रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा हंगाम निराशाजनक ठरला आहे. आयपीएल २०२२ च्या पहिल्या ८ सामन्यांमध्ये सर्वात यशस्वी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १३ सामन्यांपैकी मुंबई इंडियन्स फक्त तीनच सामने जिंकू शकली आहे आणि पॉइंट टेबलमध्ये १० व्या क्रमांकावर विराजमान आहे. प्ले ऑफमधून बाद होणारा मुंबई पहिला संघ आहे.

चेन्नई सुपर किंग्जने कर्णधार बदलत राहिली

Advertisement

सीएसकेचा नियमित कर्णधार महेंद्र सिंह धोनी हंगाम सुरु होण्यापूर्वी कर्णधार म्हणून पायउतार झाला आणि फ्रँचायझीने रवींद्र जडेजाला नवा कर्णधार म्हणून निवडून त्याच्याकडे जबाबदारी सोपवली. जडेजाच्या नेतृत्वात संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आणि अष्टपैलू खेळाडूने मध्यातच पुन्हा धोनीकडे चेन्नई संघाची धुरा सोपवली. यानंतर जडेजा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. गतविजेता चेन्नई १३ पैकी ४ सामने जिंकून ९ व्या स्थानावर आहे.

कोलकाताला नाही मिळाले परफेक्ट प्लेइंग इलेव्हन

Advertisement

नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्स, आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक वेळा प्लेइंग इलेव्हन बदलताना दिसले. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या अखेरच्या लीग सामन्यातही संघात तीन बदल करण्यात आले. संघाला सलामीचे अचूक संयोजन मिळू शकले नाही तर त्यांची गोलंदाजीही मजबूत दिसली नाही. अशा परिस्थितीत केकेआरला हंगामाच्या अखेरपर्यंत परिपूर्ण प्लेइंग इलेव्हन मिळू शकले नाही. परिणामी १४ सामन्यांतील ८ सामने गमावून संघ स्पर्धेबाहेर पडला.

Advertisement