आयपीएल२०२२ मध्ये बाहेर पडणारी दुसरा संघ चेन्नई सुपर किंग्स ठरला; धोनीचे स्वप्न भंगले

आयपीएल२०२२मध्ये बाहेर पडणारी दुसरा संघ चेन्नई सुपर किंग्स ठरला; धोनीचे स्वप्न भंगले
आयपीएल२०२२मध्ये बाहेर पडणारी दुसरा संघ चेन्नई सुपर किंग्स ठरला; धोनीचे स्वप्न भंगले

गुणतालिकेच्या तळाला असलेल्या संघात तळाला कोण राहणर ह्याची स्पर्धा सुरु झाली होती. त्यात आता कोण बाजी मारणार हे येणारा काळ ठरेल. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेला हा सामना मुंबई इंडियन्सने ५ विकेट्सने आपल्या खिशात घातला. हा मुंबईचा तिसरा विजय होता. या पराभवामुळे चेन्नईच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा धुळीस मिळाल्या. डॅनियल सॅम्सने १६ धावा देत ३ विकेट्स काढल्या त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

चेन्नईने ९८ धावांचे माफक आव्हान पार करताना मुंबईची सुरूवात देखील खराब झाली. पहिल्याच षटकात इशान किशन ६ धावा करून बाद झाला. त्याला मुकेश चौधरीने बाद केले. त्यानंतर सिमरजित सिंगने रोहित शर्माला १८ धावांवर बाद करत मुंबईला दुसरा धक्का दिला. यानंतर मुंकेश चौधरीने पाचव्या षटकात डॅनियल सॅम्स आणि ट्रिस्टन स्टब्सला शुन्यावर बाद करत मुंबईची अवस्था ४ बाद ३३ अशी केली. या विजयानंतरही मुंबई इंडियन्स गुणतालिकेत १०व्या स्थानी, तर चेन्नई संघ ९व्या स्थानी आहे. विशेष म्हणजे, मागील १३ हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश न करण्याची ही चेन्नईची दुसरी वेळ आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण डाव ९७  धावात गुंडाळला. मुंबईचा वेगावान गोलंदाज डॅनियल सॅम्सने चेन्नईची टॉप ऑर्डर उडवली. त्याने ४ षटकात १६ धावा देत ३ विकेट घेतल्या. दरम्यान, ३ बाद ५ धावांवरून चेन्नईच्या मधल्या फलंदाजीने डाव सावण्याचा प्रयत्न केला. मात्र रायुडू १०, शिवम दुबे १० आणि ब्राव्हो १२ धावा करून परतले. संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने शेवटपर्यंत फलंदाजी करत ३३ चेंडूत ३६ धावा केल्या. त्यामुळे चेन्नई निदान शंभरच्या जवळ जाऊ शकली. मुंबईकडून कुमार कार्तिकेय आणि रिले मॅरेडिथ यांनी प्रत्येकी २ तर रमनदीप सिंह आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी १ विकेट घेतली.

Advertisement

मुंबईची ४ बाद ३३ अशी बिकट अवस्था झाली असताना तिलक वर्माने संयमी खेळी करत विजयापर्यंत पोहचवले. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाकडून कर्णधार एमएस धोनी याने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने ३३ चेंडूंचा सामना करताना नाबाद ३६ धावांचे योगदान दिले. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ४ चौकारांची बरसात केली. धोनीव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडाही गाठता आला नाही. मागील सामन्यात वादळी खेळी करणारा डेवॉन कॉनवे आणि मोईन अली हे फलंदाज शून्य धावेवर तंबूत परतले. याव्यतिरिक्त महीश तीक्षणाही शून्यावर बाद झाला. दुसरीकडे, ड्वेन ब्रावोने १२, अंबाती रायुडू आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी १० धावांचे योगदान दिले. मात्र, या खेळाडूंना आपल्या संघाला १०० धावांचा आकडा पार करून देता आला नाही.

Advertisement