‘आयपीएल’ला इंग्लंडच्या खेळाडूंनी प्राधान्य देऊ नये!माजी कर्णधार आथर्टनकडून सूचना

Advertisement

पीटीआय, लंडन

इंग्लंडच्या प्रमुख खेळाडूंनी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटला प्राधान्य देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मुकणे टाळले पाहिजे. तसेच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) खेळाडूंना ‘आयपीएल’मध्ये खेळण्यासाठी विशेष सूट देणे योग्य नसल्याचे मत इंग्लंडचे माजी कर्णधार आणि समालोचक मायकल आथर्टनने व्यक्त केले. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेत इंग्लंडने निराशाजनक कामगिरी केली आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या तिन्ही सामन्यांत त्यांना मोठय़ा फरकाने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे माजी खेळाडूंकडून इंग्लंड संघावर टीका होत असून आथर्टनने खेळाडू आणि ‘ईसीबी’ला काही सूचना केल्या आहेत.

Advertisement

‘‘क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत खेळणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंना सात आकडी मानधन मिळते. असे असतानाही ‘ईसीबी’ त्यांना दोन महिने ‘आयपीएल’मध्ये खेळता यावे यासाठी पूर्ण मोकळीक देते ही आश्चर्यकारक बाब आहे. खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा ‘आयपीएल’ला प्राधान्य देता कामा नये. तसेच इतर स्पर्धामध्ये खेळता यावे यासाठी खेळाडूंना विश्रांती देणे ‘ईसीबी’ने टाळले पाहिजे. खेळाडूंसोबत १२ महिन्यांचा करार करण्यात येतो. त्यामुळे जरी त्यांनी ‘आयपीएल’ किंवा अन्य स्पर्धात खेळण्याची परवानगी मागितली, तरी ते इंग्लंड संघाच्या हिताचे असले तरच ‘ईसीबी’ने त्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले पाहिजे,’’ असे आथर्टनने स्पष्ट केले.

एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार इऑन मॉर्गन, जोस बटलर, बेन स्टोक्स, सॅम करन, मोईन अली, डेविड मलान, जॉनी बेअरस्टो यांसारखे आघाडीचे इंग्लिश खेळाडू ‘आयपीएल’मध्ये सातत्याने खेळले आहेत.

Advertisement

The post ‘आयपीएल’ला इंग्लंडच्या खेळाडूंनी प्राधान्य देऊ नये! appeared first on Loksatta.Source link

Advertisement