आयपीएलमध्ये आज गुजरात आणि पंजाब किंग्सच्या संघांमध्ये सामना रंगणार आहे

आयपीएलमध्ये आज गुजरात आणि पंजाब किंग्सच्या संघांमध्ये सामना रंगणार आहे
आयपीएलमध्ये आज गुजरात आणि पंजाब किंग्सच्या संघांमध्ये सामना रंगणार आहे

पॉवर प्लेमध्ये तडाखेबंद फलंदाजी. लियॉम लिव्हिंगस्टोन मोठी फटकेबाजी करू शकतो. अनुभवी सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार मयांक अग्रवाल यांनी आतापर्यंत मोलाचे योगदान दिलेले नाही. मधल्या फळीत जितेश शर्माकडून तर डेथ ओव्हरमध्ये शाहरुख खान आणि ओडियन स्मिथकडून धावांची अपेक्षा. – गोलंदाजीत कॅगिसो रबाडा आणि लेगस्पिनर राहुल चाहर हे मॅचविनर असून, अर्शदीप सिंग, वैभव अरोरा, लिव्हिंगस्टोन उपयुक्त कामगिरी करू शकतात.

या संघाची कमकुवत बाजू त्यांची फलंदाजी आहे. शुभमन गिल आणि कर्णधार हार्दिक पांड्या यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज धावा काढू शकले नाहीत. विजय शंकर आणि मॅथ्यू वेड यांनी निराश केले तर राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलर कामगिरीत सातत्य राखू शकले नाहीत. – गोलंदाजीत मोहम्मद शमी, राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन, अभिनव सदारंगानी, राहुल तेवतिया, जयंत यादव, अल्जारी जोसेफ यांच्याकडून प्रभावी कामगिरी अपेक्षित आहे.

Advertisement

आयपीएलच्या २०२२च्या या हंगामात ब्रेबोर्न स्टेडियवर झालेल्या लढतीत दोन्ही सामन्यात १८० हून अधिक धावा झाल्या आहेत. सुरुवातीला जलद गोलंदाजांना थोडी मदत मिळाली. पण नंतर फलंदाजांनी धावा केल्या. जर गोलंदाजांनी सुरुवातीला विकेट घेतल्या नाही तर मोठी भागिदारी होऊ शकते. केएल राहुलने पंजाबचे कर्णधारपद सोडल्यानंतर त्यांच्याकडून यावेळी फार अपेक्षे केल्या जात नव्हत्या. पण बेंगळुरूविरुद्ध २०६ धावांचे आव्हान त्यांनी पार केले. लीग क्रिकेटमध्ये लियाम लिविंगस्टोन शानदार फॉर्ममध्ये आहे. चेन्नईविरुद्ध त्याने ३२ चेंडूत ६० धावा केल्या होत्या. त्यामुळे गुजरातसाठी तो धोकादायक ठरू शकतो. या शिवाय शिखर धवन आणि मयांक अग्रवाल यांच्यावर सर्वांची नजर असेल. सुरुवातीलाच धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात मयांकने विकेट गमावली आहे. जर त्याने थोडा संयम दाखवला तर तो मोठी धावसंख्या उभी करू शकतो. शाहरुख खान आणि ओडियन स्मिथ ही जोडी मधळ्या फळीत धमाका करू शकते. कगिसो रबाडा गोलंदाजीसोबत तळात स्पोटक फलंदाजी करून पंजाबसाठी गेमचेंजर ठरू शकतो.

दुसऱ्या बाजूला हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. गुणतक्त्यात चार गुणांसह ते तिसऱ्या स्थानावर आहेत. सलामीवीर शुभमन गिलने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४६ चेंडूत ८४ धावा केल्या होत्या. गिलने १८२च्या स्ट्राईक रेटने ६ चौकार आणि ४ षटकार मारले. या शिवाय गोलंदाजी ही गुजरातची मोठी दाकद आहे. मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, राशिद खान आणि हार्दिक पंड्या सारखे खेळाडू आहेत जे सामना फिरवू शकतात. हार्दिकचे करिअर संपले की काय असे वाटत असताना त्याने आयपीएलमध्ये जोरदार कमबॅक केले आहे.

Advertisement

संभाव्य संघ-

गुजरात टायटन्स- मॅथ्यू वेड, शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर/गुरकिरत सिंग मान, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, वरुण आरोन, मोहम्मद शमी.

Advertisement

पंजाब किंग्ज- मयांक अग्रवाल, शिखर धवन, भानुका राजपक्षे/जॉनी बेअरस्टो, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाजा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग.

Advertisement