आयपीएलच्या या हंगामातील सर्वात अवघड संघ म्हणजे गुजरात टायटन्स; पुन्हा एक विजय!

आयपीएलच्या या हंगामातील सर्वात अवघड संघ म्हणजे गुजरात टायटन्स; पुन्हा एक विजय!
आयपीएलच्या या हंगामातील सर्वात अवघड संघ म्हणजे गुजरात टायटन्स; पुन्हा एक विजय!

गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जने १३४ धावांचे आव्हान २० व्या षटकात ३ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. गुजरातकडून सलामीवीर वृद्धीमान साहाने नाबाद ६२ धावांची खेळी केली. चेन्नईकडून पदार्पण करणाऱ्या मथीशा पथिरानाने २ विकेट घेतल्या. तर एन जगदीशाने नाबाद ३९ धावांची खेळी केली. इतर फलंदाजांना फारसे यश आले नाही. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ गडी गमावून १३३ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाडने ५३, एन जगदीसनने नाबाद ३९, मोईन अलीने २१ आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ७ धावा केल्या. गुजरातकडून मोहम्मद शमीने दोन तर राशिद खान, अल्झारी जोसेफ आणि आर साई किशोर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

१३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात केली. शुभमन गिल १८ धावा करून बाद झाला. मॅथ्यू वेड २० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हार्दिक पंड्या ७ धावा करून बाद झाला. रिद्धिमान साहा ६७ आणि डेव्हिड मिलर १५ धावा करून नाबाद परतला. चेन्नईच्या संघाने गुजरातविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकली. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने यावेळी प्रथम फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातने ५ चेंडू शिल्लक ठेवून ३ विकेट्सच्या नुकसानावर चेन्नईचे लक्ष्य पूर्ण केले. हा गुजरातचा हंगामातील दहावा विजय होता. या विजयासह त्यांच्या खात्यात सर्वाधिक २० गुण जमा झाले आहेत.

मराठमोळ्या रूतुराज गायकवाडने चेन्नईच्या संघाला अर्धशतक झळकावत दमदार सुरुवात करून दिली. पण तो बाद झाल्यावर चेन्नईची धावगती थोडी मंदावली होती. पण अखेरच्या षटकांमध्ये चेन्नईच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यात जगदीशनने ३९ धावा केल्या. त्यामुळे चेन्नईच्या संघाला यावेळी गुजरात समोर १३४ धावांचे आव्हान ठेवता आले. शुभमल गिलने संघाचा चांगली सुरुवात करून दिली होती. पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. गिल यावेळी १८ धावांवर बाद झाला.

Advertisement

ऋतुराजव्यतिरिक्त एन जगदीशन यानेही नाबाद ३९ धावा जोडल्या. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी या सामन्यात केवळ ७ धावा करून बाद झाला. या डावात गुजरातकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच राशिद खान, अल्झारी जोसेफ आणि साई किशोर यांच्या पदरीही प्रत्येकी एक विकेट आली.

Advertisement