इंडियन प्रीमियर लीग २०२२चा हंगाम हळूहळू समारोपाकडे वळत आहे. या हंगामातील साखळी फेरी सामने २१ मे रोजी संपतील. त्यानंतर बाद फेरी सामन्यांना सुरुवात होईल. हे सामने कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवले जाणार आहे. ईडन गार्डनवर पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामना होईल. या सामन्यांसाठी तिकीटांची विक्री सुरू झाली आहे. ऑनलाईन पद्धतीनेही हे तिकीट बुक करता येऊ शकतात.
आयपीएल २०२२चा पहिला क्वालिफायर सामना २४ मे रोजी ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवला जाईल. गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमाकांवर असलेले संघ या सामन्यात आमने सामने असतील. पहिला क्वालिफायर सामना जिंकणारा संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र होईल. तसेच गुणतालिकेत तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर असलेले संघ एलिमिनेटर सामन्यात भिडतील. हा सामनाही ईडन गार्डन स्टेडियमवरच रंगणार असून २५ मे रोजी ही लढत होईल. एलिमिनेटर सामना जिंकणारा संघ दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पहिल्या क्वालिफायर सामन्यात पराभूत होण्याऱ्या संघाशी दोन हात करेल. तर पराभूत होणारा संघ थेट स्पर्धेतून बाहेर होईल.
तिकीटांच्या किंमती
ईडन गार्डनवर पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामना होणार आहे. या सामन्यांसाठीच्या तिकीटांची किंमत स्टँड्सनुसार वेगवेगळी असेल. तिकीटांच्या किंमतीची सुरुवात ८०० रुपयांपासून ते ३००० रुपयांपर्यंत आहे. ही तिकीटे ५ कॅटेगरीमध्ये वाटली जातील, ८०० रुपये, १००० रुपये, १५०० रुपये, २००० रुपये आणि ३००० रुपये.
कसे बुक कराल तिकीट?
तिकीट बुक करण्यासाठी, प्रथम बुक माय शो वर जा.
येथे स्पोर्ट्स कॅटेगरी वर क्लिक करा.
येथे क्वालिफायर १ आणि एलिमिनेटरचा पर्याय दिसेल.
तुम्हाला पाहायचा असलेला सामना निवडा.
तुम्हाला प्रथम मोबाईल नंबर/ईमेलद्वारे पडताळणी करावी लागेल.
खाली तुम्हाला BOOK लिहिलेले दिसेल, त्यावर क्लिक करा.
तुम्हाला बुक करायच्या असलेल्या तिकिटांची संख्या एंटर करा.
त्यानंतर तुम्हाला ज्या किंमतीचे तिकीट बुक करायचे आहे ते निवडा.