आयपीएलच्या पहिल्या टप्प्यानंतर प्लेऑफ नव्या समीकरणाचे चित्र स्पष्ट होताना;नेमके कोणते वाचा…

आयपीएलच्या पहिल्या टप्प्यानंतर प्लेऑफ नव्या समीकरणाचे चित्र स्पष्ट होताना;नेमके कोणते वाचा...
आयपीएलच्या पहिल्या टप्प्यानंतर प्लेऑफ नव्या समीकरणाचे चित्र स्पष्ट होताना;नेमके कोणते वाचा...

आयपीएल २०२२मध्ये चेन्नई सुपर किंग्जला सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले. सोमवारी पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा ११ धावांनी पराभव झाला. या पराभवामुळे चेन्नईचे गुणतक्त्यातील नववे स्थान कायम आहे. आयपीएल २०२२मध्ये रविंद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचा ८ पैकी ६ लढतीत पराभव झालाय. आता प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांच्यासाठी कसे समीकरण असणार आहे ते जाणून घ्या…

पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या पराभवानंतर रविंद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग थोडा कठीण झालाय. चेन्नईचे अद्याप ६ सामने शिल्लक आहेत. जर चेन्नईने पुढील सर्व सामने जिंकले तर त्यांचे ८ विजयासह १६ गुण होतील आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग थोडा सोपा होईल.

Advertisement

याउटल जर चेन्नईने ६ पैकी ५ लढतीत विजय मिळवला तर त्यांचे १४ गुण होतील आणि तेव्हा नेट रनरेटवर ठरणार की ते प्ले ऑफमध्ये पोहोचतील की नाहीत. यासाठी चेन्नईला अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागले. याचा अर्थ स्पष्टपणे असा होतो की, चेन्नईला प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी आहे. मात्र त्यासाठी पुढील सर्व सामन्यात विजय मिळवणे गरजेचा असेल. विजय मिळवताना त्यांना नेट रनरेट देखील सुधरावे लागले. चेन्नईचे नेट रनरेट सध्या वजा ०.५३४ इतके आहे.

चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाब किंग्जने २० षटकात ४ बाद १८७ धावा केल्या. उत्तरादाखल चेन्नईला ६ बाद १७६ धावा करता आल्या. चेन्नईला अखेरच्या षटकात विजयासाठी २७ धावांची गरज होती. मैदानावर महेंद्र सिंह धोनी मैदानावर होता. पण मुंबई इंडियन्स विरुद्धच्या लढती प्रमाणे त्याला कमाल करून दाखवता आली नाही.

Advertisement

सीएसकेच्या उर्वरित लढती

१ मे- विरुद्ध हैदराबाद

Advertisement

४ मे- विरुद्ध आरसीबी

८ मे- विरुद्ध दिल्ली

Advertisement

१२ मे- विरुद्ध मुंबई

१५ मे- विरुद्ध गुजरात

Advertisement

२० मे- विरुद्ध राजस्थान

Advertisement