आयपीएलची व्ह्यूवरशीप इतिहासात पहिल्यांदाज कमी झाली, काय कारण वाचा…

आयपीएलची व्ह्यूवरशीप इतिहासात पहिल्यांदाज कमी झाली, काय कारण वाचा...
आयपीएलची व्ह्यूवरशीप इतिहासात पहिल्यांदाज कमी झाली, काय कारण वाचा...

आयपीएल २०२२ स्पर्धेला सुरूवात होऊन दोन आठवडे झाले आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच प्रेक्षकांची संख्या कमी होण्याची घटना घडली आहे. जाणून घ्या आयपीएलची व्ह्यूवरशीप किती कमी झाली. आयपीएलच्या १५व्या हंगामाला २६ मार्चपासून सुरूवात झाली आहे. या वर्षी लीगमध्ये आतापर्यंत १५ लढती झाल्या आहेत. पण आयपीएलच्या टीव्ही व्ह्यूवरशीपमध्ये मोठी घसरण झाली आहे. एका रिपोर्टनुसार दुसऱ्या आठवड्यात व्ह्यूवरशीपमध्ये ३३ टक्के इतकी घसरण झाली आहे. टीव्ही व्ह्यूवरशीप ही आयपीएलची सर्वात मोठी प्रॉपर्टी मानली जाते.

टीव्ही व्ह्यूवरशीप मॉनिटरिंग एजसी BARCच्या रिपोर्टनुसार आयपीएलची व्ह्यूवरशीप पहिल्या आठवड्याच्या तुलनेत ३.५७ मिलियनच्या जागी २.५२ मिलियन इतकी राहिली आहे. आयपीएलच्या पहिल्या आठवड्यातील रीच २६७ मिलिनय इतका होता तो १४ टक्क्यांनी घसरला आणि २२९ इतक्यावर आला. BARCनुसार ते अशा प्रेक्षकांचा विचार करतात जे टीव्हीवर आयपीएल एक मिनिटापर्यंत पाहतात. आयपीएलची व्ह्यूवरशीप प्रत्येक हंगामात पहिल्या आठवड्यापासून ते अखेरपर्यंत सारखीच राहते.

Advertisement

यावर्षी हंगामातील चेन्नई आणि कोलकाता यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात आणि पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यात युझर्स १०० मिलियनच्या पुढे गेले होते. मात्र आयपीएलची व्ह्यूवरशीप पहिल्या आठवड्यानंतर ३३ टक्क्यांनी घसरण्याची ही पहिलीच वेळ आहे. २०२३ ते २०१७च्या हंगामासाठी मीडिया आणि ब्रॉडकास्टिंग राइट्ससाठी जूनमध्ये बोली लागणार आहे. पुढील पाच वर्षासाठी बोर्डाने जवळ जवळ ३३ हजार कोटी रुपये इतकी कमाई करतील असे निश्चित केले आहे.

Advertisement