मुंबई11 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवले जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवले जाते, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकरांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये असे म्हणत भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.
दरम्यान प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, भाजप – आरएसएसच्या राजकारणाचा प्रभाव वाढल्यापासून सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
निमंत्रणे का वाटत फिरत होतात?
प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात का आली नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना केला होता, यावर बोलताना आंबेडकरांना बैठकीचे निमंत्रण द्यायला ही काय सत्यनारायणाची पूजा आहे काय? असा सवाल करून आंबेडकरांना डिवचले. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, इंडिया आघाडीमध्ये येण्यासाठी निमंत्रणाची गरज नव्हती, तर इतर पक्षांना निमंत्रणे का वाटत फिरत होतात? असा थेट सवाल काँग्रेसला विचारला आहे.
काँग्रेसच्या हेतूंवरच उभे केले प्रश्नचिन्ह
दरम्यान प्रकाश आंबेडकर म्हणाले की, इंडिया आघाडीत येण्यासाठी निमंत्रणाची गरज नव्हती, तर इतर पक्षांना निमंत्रणे का वाटत फिरत होतात? लालू प्रसाद यादव आणि स्टॅलिन या शूद्रांमधल्या मोठ्या समाजवादी नेत्यांशिवाय तुमच्या आघाडीची गाडी अडली नसती, तर त्यांना तुम्ही निमंत्रण दिले असते का याबद्दल मला शंकाच आहे, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या हेतूंवरच प्रश्न उपस्थित केला आहे.