आमदार सरोज अहिरेंचा अहिरराव भगिनीवर गंभीर आरोप: म्हणाल्या – अलका अहिरराव यांच्याकडून मतदार संघाच्या विकास कामात खोडा


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • MLA Saroj Ahiren’s Serious Allegations Against Ahirrao Sister, Said For Rajshree Ahirrao Alka Ahirrao’s Scam In The Development Work Of The Constituency

नाशिक23 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

देवळाली मतदार संघाच्या विकासासाठी मी शासनाकडुन कामे मंजुर करुन आणते, त्यासाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवते. परंतू जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंता अलका अहिरराव या आपल्या भगिनी तहसीलदार राजश्री आहिरराव यांच्या राजकिय इच्छेसाठी मतदार संघाच्या विकासात खोडा आणत असुन त्या दोन्ही भगिनींनी माझ्या विरोधात कट कारस्थान रचले आहे. मंजूर केलेला शेतकरी हिताचा निधी परस्पर रद्द करुन नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्यास भाग पाडीत असल्याचा गंभीर आरोप आमदार सरोज अहिरे यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच हिंमत असेल तर तहसिलदार पदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढवावी, असे आव्हानही यावेळी अहिरे यांनी दिले.

Advertisement

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देवळाली मतदार संघातून इच्छुकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. सन२०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार सरोज अहिरे, माजी आमदार योगेश घोलप, देवळाली कँन्टोमेंट बोर्डाच्या स्विकृत सदस्य प्रितम दिनकर आढाव, डाँ. सुवर्णा भिकचंद दोंदे, तहसिलदार डाँ राजश्री अहिरराव यांनीही जोरदार तयारी सुरु केली आहे. विद्यमान आमदार अहिरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेवून जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंता अलका अहिरराव यांनी देवळाली मतदार संघासाठी होत असलेल्या बंधारे दुरुस्तीसाठी १ कोटी ४१ लाख रुपयांची निविदा मंजुर झालेली असतांनाही त्या कामात खोडा घातला असा आरोप केला. तसेच आपल्या मोठ्या भगिणी राजश्री अहिरराव यांच्या राजकिय इच्छेसाठी विकास कामामध्ये अडथळा आणला जात आहे.

तसेच तहसिलदार राजश्री अहिरराव यांनीही नागरिकांना शिधापत्रिका वाटपाच्या कामाचा गवगवा केला, मात्र त्या शासकिय अधिकारी असुन जनतेच्या कामाचा पगार घेत असतात. त्याचप्रमाणे अलका अहिरराव यांच्या बदलीचा आणि माझा काहीही संबंध नसल्याचे सांगत जिल्ह्यातील इतर आमदारांनी मागणी केल्याचे सांगितले. तसेच त्याचप्रमाणे राजश्री अहिरराव यांना जिल्हाधिकारी गंगाधर डी. यांनी सुट्टीवरून आल्यानंतर कामावर रुजू करुन घेतले नाही, यामध्ये देखील माझा काडीमात्र संबंध नसल्याचे यावेळी सांगितले.तसेच शेतकऱ्यांचा बालाजी देवस्थान, जलसंपदा विभागाचा सातबाऱ्यावरील नाव या प्रश्न मार्गी लावले असुन एकलहरा प्रकल्पासाठी देखील मी शासनाकडे पाठपुरावा करीत असल्याचे अहिरे यांनी यावेळी सांगितले.

Advertisement

तहसील राजश्री अहिरराव यांची निवडणुक लढण्याची महत्वकांक्षा ही उघड झाली असून जनसंपर्क वाढविण्यासाठी त्यांनी नुकताच लॅमरोड परिसरात बंगला घेतला असून तेथे वास्तव्यास आले आहे. आमदार योगेश घोलप यांनी गत पराभव विसरुन मतदार संघातील नागरिकांच्या व युवकांशी जनसंपर्क वाढविला आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही नागरिकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. माजी आमदार स्व. भिकचंद दोंदे यांच्या कन्या डाँ.सुवर्णा दोंदे यांनी देखील मतदार संघ पिंजण्यास सुरुवात केली आहे. तर प्रितम दिनकर आढाव यांनी देवळाली शहरात विकास कामांच्या माध्यमातून तयारी करीत आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement