आमदार रोहित पवार यांची ग्वाही: राशीनमध्ये 11 एकरांवर उभारणार क्रीडा संकूल‎, शासकीय सेवेत भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव‎


प्रतिनिधी | मिरजगाव‎24 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

कर्जत तालुक्यात क्रिकेटचे रणजी ‎सामने खेळले जातील, एवढे मोठे‎ भव्य क्रीडा संकुल ११ एकरांवर ‎ ‎ तालुक्यातील राशीन येथे उभारणार ‎ ‎ आहोत. पुढील महिन्यातच या‎ कामाचा शुभारंभ करण्यात येईल.‎ या भागातील उत्कृष्ट खेळाडूंना ‎चांगल्या दर्जाचे मैदान उपलब्ध‎ व्हावे, तसेच जास्तीत जास्त खेळाडू ‎ ‎ तयार व्हावेत, यासाठी हे क्रीडा‎ संकूल उभारणार असल्याची‎ माहिती आमदार रोहित पवार यांनी ‎दिली.‎ मिरजगाव येथील टायगर ‎अॅकॅडेमीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी‎ घेतलेल्या उंच भरारीचे कौतुक‎ करताना व विविध शासकीय सेवेत‎ भरती झालेल्या मुलांचे सत्कार‎ समारंभात ते बोलत होते.

Advertisement

मुलांनी‎ विविध खेळांमध्ये प्राविण्य‎ मिळवण्यासाठी नेहमी उत्साही राहून‎ प्रयत्न करावा. या भागातील प्रत्येक‎ खेळाडूंना या क्रीडा संकुलात‎ प्राधान्य दिले जाईल. क्रिकेटसोबतच‎ कुस्ती, कबड्डी, बॅडमिंटन, धावणे,‎ लांब उडी, तसेच जिमनॅशीयम‎ हॉलचेदेखील काम करणार आहोत.‎ तसेच, इतर भागातून किंवा राज्यातून‎ खेळासाठी किंवा सरावासाठी येथे‎ येणाऱ्या मुला-मुलींच्या‎ राहण्याचीदेखील सोय करण्यात‎ येणार असल्याचे पवार यांनी‎ सांगितले‎ या कार्यक्रमास मिरजगाव पोलिस‎ स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक‎ सोमनाथ दिवटे, माजी जि.प. सदस्य‎ परमवीर पांडुळे, रघु आबा‎ काळदाते, व्यापारी बापू कासवा,‎ संपत बावडकर, गोरखनाथ चौकडे,‎ अनिल पांडुळे, रमेश खेतमाळीस,‎ पप्पू कोठारी, जयसिंग थिटे, राम‎ रंधवे, तानाजी पिसे, विलास मुळे,‎ टायगर अॅकॅडमीचे संचालक शरद‎ चौकडे, सत्कारमूर्ती मुले-मुली,‎ तसेच अॅकॅडमीचे प्रशिक्षणार्थी‎ मुले-मुली मोठ्या संख्येने उपस्थित‎ होते. सर्वसामान्य कुटुंबातील हुशार‎ व होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा‎ हात देण्याचे काम ॲकॅडमीचे‎ संचालक शरद चौकडे करीत‎ असल्याचे पवार म्हणाले. शासकीय‎ सेवांमध्ये भरती झालेल्या सर्व‎ विद्यार्थ्यांना सहाय्यक पोलीस‎ निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनीही‎ भरभरून शुभेच्छा दिल्या.‎Source link

Advertisement