आमदार बच्चू कडूंची वकिलामार्फत भारतरत्न सचिन तेंडुलकरला नोटीस: पैशांसाठी ऑनलाईन गेमिंगला बळी पाडले जात असल्याचा आरोप

आमदार बच्चू कडूंची वकिलामार्फत भारतरत्न सचिन तेंडुलकरला नोटीस: पैशांसाठी ऑनलाईन गेमिंगला बळी पाडले जात असल्याचा आरोप


मुंबई15 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

भारतरत्न असणाऱ्या माणसाने कोणत्या जाहिराती कराव्यात किंवा करू नयेत याच्या काही आचारसंहिता आहेत. त्यामुळे फक्त पैशांसाठी जाहिरात करून पुन्हा तरुणाईला या ऑनलाईन गेमिंगला बळी पाडले जात असेल तर त्याचा आम्ही विरोध करू, भारतरत्न सचिन तेंडुलकरला आम्ही नोटीस पाठवणार असल्याचे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले आहे. याबाबत वकिलामार्फत त्यांना नोटीस पाठवणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

Advertisement

आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना या विषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही 30 तारखेला सचिन तेंडुलकर यांना नोटीस पाठवणार आहोत. त्यांना आम्ही 30 तारखेपर्यंत वेळ दिला होता. तोपर्यंत त्यांनी यासंदर्भात त्यांची कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे आम्ही वकिलामार्फत त्यांना नोटीस पाठवणार असल्याचे आमदार बच्चू कडू म्हणाले.

तेंडुलकरविरोधात आंदोलनाच्या तयारीत

Advertisement

प्रहार संघटना सचिन तेंडुलकर विरोधात तीव्र आंदोलन करण्याची तयारी करत आहे. या आंदोलनाबाबत 30 तारखेला पुढील दिशा स्पष्ट करणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. या बरोबरच सचिन तेंडुलकरविरोधात आंदोलनाच्या तयारीत असल्याचेही संकेत त्यांनी दिले.

नेमके प्रकरण काय?

Advertisement

सचिन तेंडुलकरने आपल्या वडिलांना वचन दिल्यामुळे आपण आजपर्यंत पानमसाला, गुटखा, तंबाकू यांच्या जाहिराती केल्या नसल्याचे जाहीरपणे म्हटले आहे. मात्र, तरीही त्याने केलेल्या एका जाहिरातीवरून बच्चू कडू संतप्त झाले आहेत. त्याने ऑनलाईन गेमची जाहिरात केली आहे. या जाहिरातीलाच आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा विरोध आहे.Source link

Advertisement