आमचा श्रद्धेवर विश्वास: पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात हे ऐकूण हतबल झालो; अजित पवार, सुप्रिया सुळेंची टीका!  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Ajit Pawar On CM Eknath Shinde: I Was Dismayed To Hear That The Chief Minister Of A Progressive State Sees Astrology; Criticism Of Ajit Pawar, Supriya Sule!

मुंबईएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

आमचा श्रद्धेवर विश्वास आहे. अंधश्रद्धेवर नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. तर पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात… काय बोलावं. आम्ही हतबल झालो ऐकून, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केलीय.

Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बुधवारी मिरगाव येथील शिवनिका संस्थानच्या ईशान्येश्वर मंदिरात हजेरी लावत दर्शन घेत पूजा केली. विशेष म्हणजे हा दौरा गोपनीय होता. यासंदर्भात शासकीय यंत्रणांना पुसटशी कल्पनाही नव्हती. यावेळी शिंदे यांनी ईशान्येश्वर मंदिरातील ज्योतिषाकडे भविष्य पाहिल्याच्या चर्चा सुरूयत. त्यावरून टीकेची झोड उठतेय.

नेमके झाले काय?

Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मिरगाव येथील शिवनिका संस्थानच्या ईशान्येश्वर मंदिरात हजेरी लावत दर्शन घेत पूजा केली. यावेळी शिंदे यांनी ब्रह्मांड शास्त्रज्ञ तथा श्री शिवनिका संस्थानचे अध्यक्ष कॅ. अशोककुमार खरात यांच्या मंत्रोच्चारात ईशान्येश्वराच्या पिंडीवर जलाभिषेक केला. पूजानंतर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. संस्थानतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर या तिन्ही मंत्र्यांनी शिर्डीकडे कूच केले. यावेळी शिंदे यांनी ज्योतिषाकडे भविष्य पाहिल्याची चर्चाय.

सुळे म्हणाल्या की…

Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या भविष्य पाहण्यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, श्रद्धा असावी. आमचा श्रद्धेवर विश्वास आहे, पण अंधश्रद्धेवर नाही. डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धेविरोधात लढा दिला. त्यामुळे उभ्या देशात महाराष्ट्राची वेगळी ओळखय. महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींनी श्रद्धा जरूर ठेवावी. मात्र, अंधश्रद्धेबद्दल माझे मत वेगळे असल्याचे ते म्हणाले.

अजित दादा म्हणाले की…

Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या भविष्य पाहण्यावर अजित पवार म्हणाले की, आम्ही शिर्डी येथे गेलो. पंढरपूर येथे गेलो तर दर्शन घेतो. आपली ती परंपरा आहे. तिथपर्यंत समजू शकतो. मात्र, ज्योतिषाकडे जाऊन आपले भविष्य बघणे कितपत योग्य आहे. २१ व्या शतकात जग कुठे चालले आहे. बदल होत असताना सायन्स काय सांगत आहे. पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात…काय बोलावं आम्ही हतबल झालो ऐकून, अशा शब्दांत अजित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement