‘आप’ नेते कुंभार यांची आयुक्तांकडे मागणी: अशोभनीय कृत्याबद्दल अतिक्रमण विभाग प्रमुख जगताप यांच्यावर बडतर्फीची कारवाई करा


पुणे8 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

गेले दोन दिवस पुणे शहरांमध्ये अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका छोट्या व्यावसायिकाची अन्न पदार्थांनी भरलेली भांडी लाथेने मारुन उडवत असल्याचे दिसून येते. या प्रकरणाची चौकशी करावी आणि माधव जगताप यांना बडतर्फ करावे अशी मागणी आपचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केली आहे.

Advertisement

एक जबाबदार शासकीय अधिकाऱ्याकडून जनतेप्रती केलेले असे वर्तन हे अशोभनीय, बेकायदेशीर व असंवेदनशील आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका आयुक्तांनी अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांना बडतर्फ करायला हवे अशी मागणी कुंभार यांची आहे.

या प्रसंगामुळे पुणे महानगरपालिकेचे अधिकारी हे जनतेप्रती अतिशय असंवेदनशील असल्याचा संदेश पुण्यातील नागरिकांमध्ये गेला असून त्यामुळे महानगरपालिकेची मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली आहे.

Advertisement

महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे अनेकदा मोठ्या लोकांविरोधात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई न करता मूग गिळून बसतात आणि सामान्य पथारी व्यावसायिकांवर मात्र अरेरावी, दडपशाही करतात असा अनेक नागरिकांचा अनुभव आहे. जप्त केलेले साहित्य हे महानगरपालिकेच्या गोडाऊनमध्ये अक्षरशः चुकीच्या पद्धतीने फेकून दिले जाते. अनेकदा त्याची मोडतोड केली जाते. जप्त केलेल्या साहित्याची परस्पर चोरी झाल्याच्या घटना देखील आपच्या निदर्शनास आल्या आहेत. एकंदरीतच अतिक्रमण विभागाच्या कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होण्याची गरज आम आदमी पक्षाला वाटते असे सांगण्यात आले आहे.Source link

Advertisement