आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याचे आवाहन: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हवामान खात्याचा यलो अलर्ट, शेतकरी नागरिकांनी खबरदारी घ्या

आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याचे आवाहन: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हवामान खात्याचा यलो अलर्ट, शेतकरी नागरिकांनी खबरदारी घ्या


छत्रपती संभाजीनगर15 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज रोजी प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबई यांनी औरंगाबाद जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामध्ये सदर कालावधीत ताशी 30 ते40 किमी वेगाने वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व यंत्रणा व नागरिक, शेतकरी यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापण कक्ष औरंगाबाद यांनी कळविले आहे.

Advertisement

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 38 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे यामध्ये सर्वाधिक पाऊस सिल्लोड तालुक्यात 98 मिमी इतका झाला आहे. तर छत्रपती संभाजीनगर तालुका 27मिमी, पैठण25 मिमी गंगापूर35मिमी वैजापूर17 कन्नड52, खुलताबाद 24सिल्लोड 60सोयगाव98 फुलंब्री43मिमी इतका पाऊस झाला आहे.तसेच दहा मंडळात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचा इशारा देण्यात आला आहे

प्रशासनाने दिला खबरदारीचा इशारा

Advertisement

या गोष्टी करा :

  • विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
  • आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
  • आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.
  • तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.
  • पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका:

Advertisement
  • आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. परातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.
  • विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.
  • उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.
  • धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.
  • जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून बीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.



Source link

Advertisement