आदेश: सुटीच्या दिवशीही अतिक्रमण  हटाव मोहीम राहणार सुरू; मनपाकडून 2 पथके नियुक्त


छत्रपती संभाजीनगर5 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडकोतील सार्वजनिक वापराच्या जागा अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी महापालिकेने २ मार्चपासून अतिक्रमणे काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. आता सार्वजनिक सुटीच्या दिवशीही अतिक्रमणे काढली जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेने दोन पथकांची नियुक्ती केली आहे.सिडकोतील सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने सिडकोतील एक ते चौदा सेक्टरसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्या सेक्टरमधील अतिक्रमणांची यादी तयार केली.

Advertisement

त्यानंतर २ मार्चपासून अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली, परंतु मनपाकडून होत असलेल्या कारवाईबद्दल उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सिडकोतील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला गती देण्यासाठी दोन स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके सुटीच्या दिवशीही अतिक्रमण काढण्याची कारवाई करेल, असे आदेश अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी काढले आहेत. पथक एकचे प्रमुख वसंत भोये : सेक्टर एन-१ ते एन-७ मध्ये पथक एकचे संनियंत्रण अधिकारी म्हणून वसंत भोये यांची नियुक्ती झाली. त्यांच्या मदतीसाठी सिडकोचे सहायक कार्यकारी अभियंता उदयराज चौधरी, अतिक्रमण निरीक्षक पी. बी. गवळी, मजहर अली, सागर श्रेष्ठ आणि नगररचनाचे उपअभियंता बाळासाहेब शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पथक दोनच्या प्रमुखपदी सविता सोनवणेंची नियुक्ती सिडको एन-८ ते एन-१३ व टाऊन सेंटर या भागात कारवाई करण्यासाठी सविता सोनवणे या पथक दोनच्या प्रमुख राहतील. त्यांना मदतीसाठी सिडको कार्यालयाच्या भूमापक मीनल खिल्लारे, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशीद, आर. एम. सुरासे, संदीप काकनाटे आणि नगररचना विभागाच्या अभियंता पूजा भोंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement