आत्महत्या: मैत्रिणीचा आईला फोन, घरात मुलाने केली आत्महत्या; सोलापुरातील सिंहगड अभियांत्रिकी कॉलेजात घेत होता शिक्षण


सोलापूर/ मोहोळ11 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

अज्ञात कारणावरून सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्याने घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १५ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता मोहोळ शहरातील यमाईनगर येथे घडली. पूर्ण तपासानंतर खरे कारण समोर येईल, असे मोहोळ पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

Advertisement

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : कृष्णा दत्तात्रय जाधव याची तब्येत ठीक नसल्याने १५ मे रोजी तो सोलापूर येथील खासगी दवाखान्यात आईसह जाऊन औषध उपचार घेऊन घरी आला होता. नेहमीप्रमाणे पाण्याची बाटली घेऊन दुसऱ्या मजल्यावर त्याच्या खोलीत आराम करण्यासाठी गेला. दरम्यान रात्री नऊ वाजता कृष्णा गच्चीवर काही तरी करून घेत असल्याचा त्याच्या मैत्रिणीचा फोन त्याच्या आईला आला. यानुसार कुटुंबीयांनी गच्चीवर जाऊन पाहिले असता दरवाजा व खिडकी बंद होती. कृष्णाला आवाज देऊनही दरवाजा उघडत नव्हता, म्हणून दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता कृष्णाने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला तत्काळ मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाल्याची खबर मृताचे भाऊ महेश दत्तात्रय जाधव याने मोहोळ पोलिसांत दिली आहे. शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. तपास पोलिस नाईक विजय घोगरे करीत आहेत.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement