आतापर्यंतचा सर्वात मोठी मजबूत संघ हा इतिहासातील सर्वात कमकुवत संघ ठरला

आतापर्यंतचा सर्वात मोठी मजबूत संघ हा इतिहासातील सर्वात कमकुवत संघ ठरला
आतापर्यंतचा सर्वात मोठी मजबूत संघ हा इतिहासातील सर्वात कमकुवत संघ ठरला

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ३७व्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा पुन्हा एकदा हंगामातील सलग आठव्या सामन्यात दारुण पराभव झाला. रविवारी मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडिअमवर लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध पार पडलेल्या या सामन्यात मुंबईला ३६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. लखनऊच्या विजयाचे शिल्पकार कर्णधार केएल राहुल आणि कृणाल पंड्या ठरले. पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या मुंबईने या सामन्यात नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या लखनऊ संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १६८ धावांचा डोंगर उभा केला होता. लखनऊच्या १६९ धावांचा पाठलाग करताना मुंबई संघाला ८ विकेट्स गमावत १३२ धावाच करता आल्या. यामुळे मुंबई पुन्हा एकदा पराभवाच्या खाईत पडला.

आयपीएलच्या ३७ व्या सामन्यात आज लखनौ सुपर जायंटने मुंबई इंडियन्स समोर १६८ धावा उभारल्या. विशेष म्हणजे या १६८ धावात कर्णधार केएल राहुलच्या एकट्याच्या १०३ धावांचा मोठा वाटा आहे. केएल राहुलने यंदाच्या हंगामातील आपले दुसरे शतक ठोकले. विशेष म्हणजे ही दोन्ही शतके त्याने मुंबई इंडियन्स विरूद्ध ठोकली आहेत. केएल राहुलच्या या कर्णधार पदाला शोभेल अशी खेळी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याच्या या शतकी खेळीवर मीम्सचा पाऊस पडत आहे.

Advertisement

मुंबईची पुन्हा निराशा

Advertisement

मुंबईकडून फलंदाजी करताना रोहित शर्माने ३९ धावांचे योगदान दिले. या धावा त्याने ३१ चेंडूंत १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने केल्या. तसेच, तिलक वर्माने ३८ आणि कायरन पोलार्डने १९ धावांचे योगदान दिले. यांच्याव्यतिरिक्त इतर कोणालाही खास कामगिरी करता आली नाही. मुंबईचा १५.२५ कोटींचा खेळाडू इशान किशन फक्त ८ धावा करून तंबूत परतला. तसेच, ‘बेबी एबी’ म्हणून ओळखला जाणारा डेवाल्ड ब्रेविसही खास कामगिरी करू शकला नाही. त्याने फक्त ३ धावा केल्या. सूर्यकुमार यादवची बॅट या सामन्यात तळपलीच नाही. तोही ७ धावांवरच तंबूत परतला. यामुळे मुंबईची पुन्हा निराशा झाली. यावेळी लखनऊकडून गोलंदाजी करताना कृणाल पंड्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना १९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. मोहसिन खान, रवी बिश्नोई आणि आयुष बदोनी यांना प्रत्येकी १ विकेट घेण्यात यश आले.

केएल राहुलचे विक्रमी शतक

Advertisement

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना लखनऊ संघाकडून कर्णधार केएल राहुलने शानदार शतक साकारले. त्याने ६२ चेंडूंचा सामना करताना ४ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने १०३ धावा चोपल्या. त्याला सामनावीराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याच्याव्यतिरिक्त फक्त मनीष पांडेला २२ धावा करता आल्या. इतर फलंदाजांना २० धावांचा आकडाही पार करता आला नाही. मात्र, याचा फटका संघाला बसला नाही. कारण कर्णधाराच्या अफलातून खेळीमुळे लखनऊने सन्मानकारक धावसंख्या उभारली होती, जी पार करण्यात मुंबईचे फलंदाज अपयशी ठरले. यावेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना रिले मेरेडिथ आणि कायरन पोलार्ड यांनी प्रत्येकी २ विकेट्स खिशात घातल्या. तसेच, डॅनियल सॅम्स आणि जसप्रीत बुमराह यांनी १ विकेट घेतली. या विजयासह लखनऊने गुणतालिकेत चौथा क्रमांक गाठला. दुसरीकडे, मुंबई संघाची गाडी गुणतालिकेतील शेवटच्या स्थानाचे स्टेशन सोडायचं नावच घेत नाहीये.

Advertisement