अकोला3 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवांबाबत खबरदारी घेण्यात यावी, असा अादेश अमरावती विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी शुक्रवारी दिला. त्यांनी िजल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा घेतला. मनपा, नगरपालिका क्षेत्रातील मुलभूत सोई सुविधा विकास अंतर्गत करावयाच्या विकासकामांबाबत त्यांनी आढावा घेतला.
त्यात महापालिकेच्या यंत्रणेमार्फत करावयाची कामे व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करावयाची कामे अशा दोन यंत्रणांमार्फत माहिती सादर करण्यात आली. याबाबत िवभागीय अायुक्तांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, सदाशिव शेलार, बाबासाहेब गाढवे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, मनपा व जिल्हा मुख्यालयातील अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.