आज प्रजासत्ताक दिन: पद्म पुरस्कार जाहीर, सूर्यकुमार ICC मेन्स टी-20 प्लेयर ऑफ द इयर; ‘पठाण’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नमस्कार दिव्य मराठीच्या मॉर्निंग न्यूज ब्रिफमध्ये आपले स्वागत…. आज गुरुवार 26 जानेवारी असून माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी… आज प्रजासत्ताक दिन. आपणा सर्वांना दिव्य मराठी परिवाराकडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….

Advertisement

पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी….

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर

Advertisement

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आली आहेत. पश्चिम बंगालचे डॉ. दिलीप महालानबीस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर तबलावादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच कुमार मंगलम बिर्ला आणि सुधा मूर्ती यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर अभिनेत्री रवीना टंडनला ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झाला आहे. वाचा सविस्तर

सूर्यकुमार ICC मेन्स टी-20 प्लेयर ऑफ द इयर

Advertisement

भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव ICC मेन्स टी-20 प्लेयर ऑफ द इयर ठरला आहे. हे स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. तर मोहम्मद सिराज जगातील नंबर 1 वनडे गोलंदाज बनला आहे. तसेच दमदार फॉर्ममध्ये असलेला शुभमन गिल आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च स्थान मिळवणारा भारतीय खेळाडू बनला आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी ही घोषणा केली. वाचा सविस्तर

साहित्य संमेलनात पुन्हा एकदा राजकीय मंडळी

Advertisement

वर्ध्यात 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान होणारे 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पुन्हा एकदा राजकीय नेत्यांची गर्दी पाहायला मिळणार आहे. संमेलनाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे, तर समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर आणि सुधीर मुनगंटीवार करणार आहेत. त्यामुळे संमेलनात राजकीय नेत्यांची गर्दी पाहायला मिळणार आहे. वाचा सविस्तर

शाहरुख खानच्या ‘पठाण’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

Advertisement

शाहरुख खानचा पठाण चित्रपट काल प्रदर्शित झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी ‘पठाण’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाचे शो हाऊसफुल होते. दरम्यान, रिलीजच्या 2-3 दिवसातच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. वाचा सविस्तर

अफगाणिस्तानात वाचा सविस्तर

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement