आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत: 38 हजार कोटींच्या प्रकल्पांचे करणार भूमिपूजन, वाहतुकीत बदल; ठिकठिकाणी पोलिसांचा फौजफाटा


20 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत सुमारे 38 हजार 800 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असून येत्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारांचा नारळच फोडण्यात येणार आहे. विरोधकांकडूनही अशाप्रकारची टीका होत आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. शिवाय वाहतुकीत देखील बदल करण्यात आला आहे. आज घाटकोपर-वर्सोवा मेट्रो ही काही कालावधीसाठी बंद असणार आहे. मुंबईतील वाहतूकीतीबाबत वाहतूक विभागाच्या अधिकृत माध्यमांवरून वेळोवेळी माहिती मिळणार आहे. कोणतीही समस्या अथवा शंका असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

स्वनिधी योजनेचा प्रारंभ

Advertisement

यावेळी पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थींना कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभही होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानावर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास हे कार्यक्रम होतील. कर्नाटकातील विविध विकासकामांचे उद‌्घाटन करून मोदी मुंबईत येणार आहेत.

या प्रमुख कामांचा समावेश

Advertisement

मेट्रो मार्गिका 2 अ आणि 7 चे लोकार्पण, मनपाच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या 20 शाखांचे लोकार्पण, 7 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी, मनपाच्या तीन रुग्णालयांच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन, 400 किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन आदी कार्यक्रम मोदींच्या हस्ते होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यक्रम होतील.

असा आहे बंदोबस्त

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जवळपास 2500 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पोलिस टीमचे सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच पाच पोलीस उपायुक्त तैनात राहणार आहेत. त्यांच्यासोबत 27 एसीपी, 171 पोलीस निरीक्षक आणि 397 अधिकाऱ्यांचा समावेश असेल.

यामध्ये 600 महिला पोलिसांचा समावेश आहे. याशिवाय खबरदारी म्हणून राज्य राखीव पोलिस दलाच्या चार तुकड्या, दंगल नियंत्रक पथकाची एक तुकडी आणि रॅपिड अॅक्शन फोर्सही तैनात करण्यात आली आहे. मुख्य कमांड मुंबई पोलिस आयुक्तांच्या हातात असेल.

Advertisement

अफवांचे मेसेज

आज पंतप्रधान मुंबईत येत असल्याने काही व्यावसायिक कार्यालये बंद राहतील अशा अफवांचे मेसेज व्हायरल होत आहे. मात्र, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. मुंबईत सर्व आस्थापना सुरळीत सुरू असून अफवावर विश्वास ठेवू नका, असे मुंबई पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे.

Advertisement

संबंधीत वृत्त

संजय राऊत यांचा घणाघात

Advertisement

शिवसेनेने महानगरपालिकेत ज्या कामांची पायाभरणी केली त्याच कामांचे उद्धाटन करण्यासाठीच प्रधानमंत्री येत आहे. शिवसेनेने सुरु केलेल्या कामांना जी गती मिळाली त्यामुळेच भारतीय जनता पक्षाला आज त्यांच्या प्रचाराचे भूमिपुजन करता येत आहे. अशी टीका शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. वाचा सविस्तर

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement