पुणेएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
आजी आजोबाचा त्यांच्या आय़ुष्यातील शेवटचा मित्र म्हणजे त्यांच नातवंड. नातवंडच्या आयुष्यातील त्याचे पहिले मित्र म्हणजे आजी आजोबा असतात याचं कारण म्हणजे दोघांकडेही असलेला वेळ. लहान मुलांना भिती कशाची वाटत असेल तर ती अनोळखीपणाची. या अनोळखी गोष्टींची ओळख करून देणारे आजीआजोबा असतात. जशा नद्या संगमाच्या ठिकाणी एकमेकांत मिसळतात, त्यांचे पाणी ओळखू येत नाही तसेच आजी आजोबा नातवंड एकमेकांच्या सहवासात मिसळून जातात. त्यामुळे आजीआजोबा नातवंड हा घरातील नव्या जुन्याचा संगम आहे अशा शब्दात ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी भावना व्यक्त केल्या.
निमित्त होते ते जागतिक आजी आजोबा दिनाचे
पुणे नवरात्रौ महोत्सव व राजीव गांधी ई लर्निंग स्कूल यांनी जागतिक आजी आजोबा दिनाच्या पूर्व संध्येला डॉ. कुमार सप्तर्षी व उर्मिला सप्तर्षी, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत हरिभक्त परायण उल्हासदादा पवार व अनुराधा पवार, डॉ. वीणा देव आणि कवयत्री डॉ. संगीता बर्वे व राजीव बर्वे यांचा “आदर्श आजी आजोबा पुरस्कार” देऊन पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागूल यांनी सत्कार केला. यावेळी महोत्सवाचे उपाध्यक्ष घनश्याम सावंत, कोषाध्यक्ष व श्रीगणेश सहकारी बँकेचे अध्यक्ष नंकदुमार बानगुडे, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, प्राचार्य जांबुवंत मसलकर आणि सुनील महाजन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
असुरक्षिततेची भावना आजी-आजोबा नष्ट करतात
डॉ. सप्तर्षी म्हणाले, नातवंडांच्यातील असुरक्षिततेची भावना आजी आजोबाच नष्ट करतात. लहान मुलांना सतत अनेक प्रश्न पडत असतात, त्याची उत्तरेही आजी आजोबांनी देणे आज आवश्यक झाले आहे. तशी तयारी आजी आजोबांनीही केली पाहिजे हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. जिथे अक्कल नसते तिथे नक्कल चालते. नातवंडांना वयोमानाने अक्कल नसल्याने ते आजी आजोबांचीच नक्कल करत असतात. त्यामुळे आजी आजोबांनीही त्यांच्याशी वागताना जपून वागणे किंवा कृती केली पाहिजे. आईवडीलही आपले मूल चांगले व्हावे यासाठी नवे नव शिकवत असतात. त्याचवेळी आजी आजोबांनी त्याला विरोध करण्याऐवजी नातवंडाला चांगले बोलायला, वागायला शिकवले पाहिजे.
आबा बागूल म्हणाले, राजीव गांधी ईलर्निंग स्कूलचे सुमारे चारशे विद्यार्थी आयआयटीत शिकत किंवा शिकलेले आहेत. आयएएस – आयपीएस होत आहेत. दोन विद्यार्थी नासा संसोधन संस्थेत कार्यरत आहेत. हे सर्व विद्यार्थी गरीब कुटुंबातील किंवा घरात कोणतिही शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातील आहेत. या विद्यार्थ्यांकडे बघितल्यावर त्यांच्यावर चांगले संस्कार झाले तर ते चांगले नागरीक होऊ शकतात हा आत्मविश्वास मिळाला. त्यातून सध्या समाजातील एकंदर वातावरण बघून आम्ही दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी “हरवलेले संस्कार” अशी मालिका सुरू केली आहे.