आजपासून मुलांचे व्हॅक्सिनेशन रजिस्ट्रेशन सुरू: 15-18 वयोगटासाठी कोविन अ‍ॅपद्वारे किंवा साइटवर स्लॉट बुकिंग करू शकता; 10वी ओळखपत्र देखील वैध असेल


 • Marathi News
 • National
 • Marathi News | India | Vaccination | Age 15 To 18 Will Be Able To Book Slots On The Cowin App Or Onsite; 10th ID Card Will Also Be Valid

Advertisement

नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी

 • कॉपी लिंक

आज नववर्षाची सुरुवात झाली असून, देशातील 15 ते 18 या वयोगटातील मुलांना येत्या 03 जानेवारीपासून कोरोना लस दिली जाणार आहे. त्यासाठी आजपासून कोविन या लसीकरणाच्या अॅपवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर 3 जानेवारीपासून देशातील 15 ते 18 या वयोगटातील मुलांना लस दिली जाईल.

Advertisement

कोविन अॅपवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे दहावीचे शाळेचे ओळखपत्र देखील ग्राह्य धरले जाणार आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गाईडलाईन्स जारी केली आहेत. लहान मुलांना लस देण्यासाठीची सीरींज, नीडल कदाचित वेगळी असणार आहे. आज 1 जानेवारीपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होणार आहे.

CoWIN पोर्टलवर आणखी एक स्लॉट जोडण्यात येणार आहे. तिथून मुलांना लसीकरणासाठी स्लॉट बुक करता येणार आहे. अनेक विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याने दहावीचे ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल. असे सरकारने आपल्या गाईडलाईन्समध्ये सांगितले आहे.

Advertisement

असे करा कोविन अ‍ॅपवर नोंदणी

 • सर्वात आधी आपल्याला आरोग्य सेतु अ‍ॅप किंवा Cowin.gov.in या वेबसाइट जावे लागणार आहे.
 • जर तुमचे CoWIN वर रजिस्टेशन नाहीत तर, रजिस्टर हा पर्याय निवडावे.
 • त्यानंतर आता तुमच्या समोर एक रजिस्ट्रेशन पेज आले असेल. त्यावर फोटो, आयडी टाईप, आपले संपुर्ण नाव हे टाका. ( येथे आपण इयत्ता दहावीचा आयडी कार्ड देखील सिलेक्ट करू शकता) सोबतच मुलाचे वय आणि लिंग स्त्री/ पुरुष टाका.
 • त्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर एक एसएमएस प्राप्त होईल.
 • त्यानंतर तुम्हाला आपल्या एरियाचा पिन कोड टाकावा लागेल, पिन कोड टाकल्यानंतर लगेचच तुमच्यासमोर कोरोना लसीकरण सेंटरची यादी येईल. त्यात तुम्हाला जो योग्य वाटेल त्याची निवड करा.
 • तारीख, वेळ टाकल्यानंतर नियोजीत दिवशी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घ्या.
 • लसीकरण केंद्रावर आपल्याला आयडी कार्ड आणि सिक्रेट कोडची माहिती द्यावी लागणार आहे. जो की तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर देण्यात येईल.
 • जर आपण पुर्वीपासून कोविन अ‍ॅप वापरत असाल, तर साइन इन हा पर्याय निवडावे. त्यानंतर आपला रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक टाका आणि गेट OTP हा पर्याय निवडा.
 • त्यानंतर आलेला OTP टाकून, व्हेरिफाई करुन घ्या.
 • आता आपल्या परिसराचा पिन कोड टाका. त्यानंतर आपल्यासमोर लसीकरण सेंटरची यादी आली असेल. त्यावर वेळ, दिनांक टाका.
 • एक मोबाईल क्रमांकाद्वारे सुमारे चार जणांचे रजिस्टेशन होऊ शकते. कृपया याची नोंद घ्यावी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती घोषणा
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबरला 15 ते 18 या वयोगटातील मुलांना कोरोना लस दिली जाईल. याची घोषणा केली होती. मोदी म्हणाले होते की, नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून लहान मुलांच्या लसीकरणाची नोंदणी प्रक्रिया सुरु केली जाईल. त्यानंतर 03 जानेवारीपासून मुलांना कोरोना लस दिली जाणार आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement