आयपीएलच्या १५व्या हंगामातील ४५वी लढत आज ४ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. जाणून घ्या या लढतीचे एक्स फॅक्टर…आयपीएल २०२२ मध्ये सलग चार पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर विजय मिळवला होता. तेव्हा चेन्नईचे नेतृत्व रविंद्र जडेजाकडे होते आणि आज महेंद्र सिंह धोनीने पुन्हा संघाची सूत्रे हाती घेतली आहेत. आज पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. विद्यामान चॅम्पियन चेन्नई या हंगामात दुसऱ्यांदा आरसीबीविरुद्ध खेळणार आहे. चेन्ननई पुन्हा बाजी मारणार की आरसीबी पहिल्या पराभवाचा बदला घेणार याची उत्सुकता सर्वांना आहे.
दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी आजची लढत महत्त्वाची आहे. चेन्नईने ९ पैकी ३ सामन्यात तर बेंगळुरूने १० पैकी ५ सामन्यात विजय मिळवलाय. आरसीबीच्या फलंदाजांना गेल्या काही सामन्यात धावा करण्यात अपयश आले आहे. संघात मोठी नाव आहेत, पण पॉवर प्लेमध्ये वेगाने धावा करण्यात त्यांना अपयश आलय. विराट कोहली फॉर्ममध्ये परतला आहे. पण त्याचे अर्धशतक टी-२० क्रिकेटचा विचार करता संथ म्हणावे लागले.
कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या फॉर्ममध्ये सातत्य दिसत नाही. तर दिनेश कार्तिक अखेरच्या षटकात फिनिशिंग टच देण्यात अपयशी ठरतोय. अशा परिस्थितीत जर त्यांनी १-२ लढती गमावल्या तर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतात. या हंगामातील पहिल्या लढतीत चेन्नईने शिवम दुबे (नाबाद ९५) आणि रॉबिन उथप्पा (८८) यांच्या तुफान फलंदाजीच्या जोरावर ४ बाद २१६ धावा केल्या होत्या. त्या सामन्यात बेंगळुरूला विजय मिळवता आला नाही पण १९३ पर्यंत मजल मारली होती.
चेन्नईची सूत्रे धोनीने हाती घेतल्यापासून संघात नवा उत्साह आला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मजबूत आक्रमक गोलंदाजीची चेन्नईने धुलाई केली होती. ते अद्याप प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. आजच्या लढतीत चेन्नईकडून पुन्हा तशाच कामगिरीची अपेक्षा असेल. संघात दीपक चहरच्या जागी संघात समावेश करण्यात आलेला मुकेश चौधरीला लय सापडली आहे. गेल्या सामन्यात चार विकेट घेऊन विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
गेल्या पाच सामन्यात या मैदानावर चार वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. दुसऱ्यांदा फलंदाजी करताना १४४ आणि १५३ धावा देखील करता आल्या नाहीत. हंगामात या मैदानावर दोन वेळा २००हून अधिक धावा झाल्या आहेत. त्यामुळेच टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणे अधिक योग्य ठरले. तापमान २६ डिग्रीच्या आसपास असेल.
संभाव्य संघ
चेन्नई सुपर किंग्ज– ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉन्वे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, मोईन अली, ड्वेन प्रीटोरियस, महीश तीक्षणा, सिमरजीत सिंह, मुकेश चौधरी
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू– फाफ डुप्लेसिस, विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, वानिंदु हसारंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवुड, मोहम्मद सिराज