आगीच्या 2 घटनांनी पुणे होरपळले: सिंहगड रोडवर गॅसची पाईपलाईन फुटली, नऱ्हे परिसरात भंगारच्या गोडाऊनला भीषण आग


पुणे35 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पुण्यातील सिंहगड रोडवरील दांडेकर पुलाजवळ MNGL कंपनीची गॅसची पाईपलाईन फुटल्याची घटना घडली आहे. ही घटना रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर पहाटे चार वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश मिळाले.

Advertisement

सिंहगड रोडवरील दांडेकर पुलाजवळ अचानक गॅसची पाईपलाईन फुटल्याची घटना घडल्याने एकच गोंधळ उडाला. त्यानंतर ही आग पसरतच गेली. आगीमुळे एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम याठिकाणी सुरु आहे, कारण आग तिन्ही बाजूला पसरल्याने ती विजवण्यासाठी अग्निशामक दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. पाईपमधून गॅसचा प्रवाह सुरु असल्याने आग आटोक्यात येत नव्हती.

Advertisement

आणखी एक घटना

पुण्यातील नऱ्हे परिसरात भंगार सामानाच्या एका गोडाऊनला भीषण आग लागली होती. याठिकाणी अग्निशामक दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अखेर रात्री उशिरा ही आग आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र पुणे शहर एकाचवेळी दोन आगीच्या घटनांनी होरपळून निघाले.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement