आंदोलन: शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई अन् दुधाला  दहा रुपये अनुदान द्या – काँग्रेसची मागणी

आंदोलन: शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई अन् दुधाला  दहा रुपये अनुदान द्या – काँग्रेसची मागणी


छत्रपती संभाजीनगर26 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या मार्गावर कॉग्रेसने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. छ. संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही.तसेच दुध उत्पादन खर्चात वाढ झाली असून त्यामुळेशेतकरी अडचणीत आले आहेत.त्यामुळे दहा रुपये राज्य सरकारने अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी कॉंंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

Advertisement

शेतकरी सापडला अडचणीत

काळे म्हणाले की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही. शेतकऱ्यांना दुधाच्या बाबतीत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची गरज असल्याची मागणी कल्याण काळे यांनी यावेळी केली.

Advertisement

हज हाऊस उघडा अन्यथा आम्ही हज हाऊस उघडणार विभागीय आयुक्तांना दिलेनिवेदन

शहरातील हज हाऊसचे पुर्ण काम होऊन सुध्दा उघडण्यात आलेले नाही. येणा-या ७ जुन पासुन मराठवाडयातुन हज साठी भावीक रवाना होणार आहे. मात्र अजूनही हज हाऊस भाविकांसाठी उपलब्ध नसल्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. याबाबत कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष युसुफ शेख जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यानी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. ७ दिवसांच्या आत हज हाऊस उघडले नाही तर औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने हज हाऊस उघडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. हे निवेदन औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे व औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त यांना देण्यात आले.

Advertisement

कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे तसेच शहरअध्यक्ष युसुफ शेख किरण पाटील डोणगावकर,भाऊसाहेब जगताप,संतोष शेजूळ, सागर नागरे, दीक्षा पवार, जमील पटेल, सुरेश शिंदे, पुंडलिक जंगले, शिवाजीराव ढाकणे, निलेश आंबेवाडीकर, विजय कांबळे, अभिषेक शिंदे, सदाशिव विटेकर, प्रभाकर वाघ आदी उपस्थित होते.



Source link

Advertisement