आंदोलन: जुन्या पेन्शन योजनेसाठी सांगलीत शिक्षक रस्त्यावर


सांगली36 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

‘एकच निर्धार, शिक्षकांना जुन्या पेन्शनचा अधिकार’ अशा घोषणा देत राज्यव्यापी शिक्षक व शिक्षकेतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध २२५ संघटनांच्या वतीने रविवारी सांगलीत भव्य मोर्चा काढला. या मोर्चात विविध मागण्यांचा एल्गार करण्यात आला. जुनी पेन्शन दिली नाही, तर राज्य सरकार उलथवणार, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री विश्वजित कदम यांनी केले. शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून सकाळी १० वाजता मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हा परिषद, राममंदिर चौक, काँग्रेस कमिटी असा मोर्चा निघाला. त्यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या राज्यव्यापी शिक्षक व शिक्षकेतर मोर्चात राज्यातील सुमारे ५ हजारांहून अधीक कर्मचारी सहभागी झाले हाेते.

Advertisement

यावेळी रोहित पाटील म्हणाले की, हिमाचल प्रदेश व इतर राज्यात जुनी पेन्शन योजना लागू केली नाही म्हणून तेथील राज्य सरकारे उलथवण्यात आली. आता महाराष्ट्राने शिक्षकांना न्याय न दिल्यास राज्यात सत्ता बदल अटळ आहे. उपमुख्यमंत्री फडणवीसांना जुनी पेन्शन लागू करण्याच्या अध्यादेशावर सही करण्यासाठी हातात कंप का भरला आहे का, असा मुद्दा उपस्थित केला. ही योजना लागू केल्यास राज्य दिवाळखोरीत निघेल, असे त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement