आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा: यश चावडेच्या नाबाद 508 धावांचा विक्रम, 81 चौकार, 18 षटकारांची केली बरसात


नागपूर2 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

सरस्वती विद्यालयाचा प्रतिभावान क्रिकेटपटू यश चावडेने शुक्रवारी मुंबई इंडियन्सतर्फे आयोजित १४ वर्षांखालील आंतरशालेय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सिद्धेश्वर विद्यालयाविरुद्ध खेळताना नाबाद पाचशे आठ धावा ठोकण्याचा अनोखा पराक्रम केला.

Advertisement

झुलेलाल कॉलेजच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या सरस्वती विद्यालयाने निर्धारित ४० षटकांत बिनबाद ७१४ धावा कुटल्या. यात एकट्या यशचा नाबाद ५०८ धावांचा वाटा होता. सलामीवीर यशने ८१ चौकार व १८ षटकारांच्या मदतीने केवळ १७८ चेंडूंत या धावा काढल्या. १४ वर्षांच्या यशने सिद्धेश्वरच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. विदर्भात कोणत्याही फलंदाजाने आतापर्यंत काढलेल्या या सर्वाधिक वैयक्तिक धावा आहेत.

या सामन्यात यशचा ओपनिंग पार्टनर तिलक वाकोडेनेही नाबाद शतक झळकावले. त्याने १३ चौकारांसह ९७ चेंडूंत नाबाद १२७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना सिद्धेश्वर विद्यालयाचा संघ ५ षटकांत केवळ नऊ धावांतच गारद झाला. सरस्वती विद्यालयाने हा सामना ७०५ धावांच्या विशाल फरकाने जिंकला. उल्लेखनीय म्हणजे, विदर्भाचे रणजीपटू फैज फजल, अक्षय वाडकर व अक्षय कोल्हार सरस्वती विद्यालयाचेच खेळाडू आहेत.

Advertisement

गोलंदाज सळो की पळो

यश चावडेने साकारलेल्या खेळीत तब्बल ८१ चौकार आणि १८ षटकार लगावले. अप्रतिम खेळीने त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्याने आपल्या संघासाठी खेळी साकारताना वैयक्तिक विक्रमही केला. त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना सळो की, पळो करुन सोडले. त्याच्या या खेळीची क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. यश ओपनिंग फलंदाज असून त्याच्याकडून मोठ्या आशाही ठेवल्या जात आहेत.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement