अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट मालिका : ख्वाजाच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाचे वर्चस्वसिडनी : उस्मान ख्वाजाने कसोटी क्रिकेटमधील पुनरागमन सलग दुसऱ्या डावातही शतक झळकावून झोकात साजरे केले. या बळावर ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी आपला दुसरा डाव ६ बाद २६५ धावांवर घोषित करीत इंग्लंडपुढे चौथी कसोटी जिंकण्यासाठी ३८८ धावांचे लक्ष्य समोर ठेवले.

Advertisement

चौथ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा इंग्लंडच्या झ्ॉक क्रॉवली आणि हसीब हमीद या सलामीवीरांनी बिनबाद २९ अशी मजल मारली. २०१९नंतर प्रथमच कसोटी सामना खेळणाऱ्या ख्वाजाने पहिल्या डावात १३७ धावा केल्या होत्या. त्याने दुसऱ्या डावातही धावांचे सातत्य राखताना १३८ चेंडूंत १० चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद १०१ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया ४ बाद ८६ धावांच्या स्थितीत असताना ख्वाजाने कॅमेरून ग्रीनच्या (७४) साथीने पाचव्या गडय़ासाठी १७९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्याआधी, सकाळच्या सत्रात इंग्लंडचा पहिला डाव २९४ धावांवर संपुष्टात आला.

The post अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट मालिका : ख्वाजाच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement