अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट मालिका : पावसाच्या व्यत्ययानंतर ऑस्ट्रेलियाची सावध सुरुवातऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील चौथ्या अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट सामन्याचा पहिला दिवस पावसाने गाजवला. पावसाच्या व्यत्ययानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सावध सुरुवात करताना ३ बाद १२६  धावांपर्यंत मजल मारली. 

Advertisement

सिडनी येथे खेळवण्यात येणाऱ्या या कसोटीत पहिल्या दिवशी ४६.५ षटकांचाच खेळ शक्य झाला. उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ ६, तर उस्मान ख्वाजा ४ धावांवर खेळत आहे. पावसामुळे दिवसातील एकूण तीन तासांचा खेळ वाया गेला.

नाणेफेके जिंकून प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नर (३०) आणि मार्कस हॅरिस (३८) यांनी ५१ धावांची सलामी दिली. स्टुअर्ट ब्रॉडने वॉर्नरला बाद केले. तिसऱ्या क्रमांकावरील मार्नस लबूशेन (२८) आणि हॅरिस यांनी

Advertisement

दुुसऱ्या गड्यासाठी ६० धावांची भर घातली. परंतु दोघेही लागोपाठच्या षटकात बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची १ बाद १११ धावांवरून ३ बाद ११७ अशी अवस्था झाली.

अखेर ४७वे षटक सुरू असताना पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने पंचांनी निर्धारित वेळेच्या ३७ मिनिटांपूर्वीच खेळ संपल्याचे जाहीर केले.

Advertisement

The post अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट मालिका : पावसाच्या व्यत्ययानंतर ऑस्ट्रेलियाची सावध सुरुवात appeared first on Loksatta.Source link

Advertisement