अमरावतीएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
शिवसेनेसोबत युतीची चर्चा सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी मला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतही जायला आवडेल. मी त्यांना कधीही विरोध केला नाही. सोबत जाण्यासाठी मी त्यांच्याशी बोलणार नाही, गरज वाटत असेल तर त्यांनी माझ्याशी बोलावे, अशी अट घातली आहे.
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल अंमलकार यांच्या प्रचारार्थ अॅड. आंबेडकर यांनी रविवारी येथे मेळावा घेतला. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘शिवसेनेसोबत युतीची चर्चा झाली आहे, परंतु घोषणा नेमकी केव्हा करायची हे अद्याप ठरले नाही. सध्या निवडणूक प्रचारार्थ मी विदर्भात आहे, तर आमचे प्रदेशाध्यक्ष मानवत येथील मेळाव्याच्या तयारीत व्यग्र आहेत. त्यामुळे युतीची घोषणा आज-उद्या होईल हे कदापि शक्य नाही. त्यासंदर्भात आलेल्या बातम्या या खऱ्या नाहीत.’ नवे शैक्षणिक धोरण (एनईपी) हे कालसुसंगत नसून ते राज्यावर लादण्याचा प्रयत्न होतोय. नेट-सेट झाल्यानंतर प्राध्यापक म्हणून नोकरीत लागलेल्यांचा कायमीकरणासह पदोन्नती व निवृत्तिवेतनाचा मुख्य मुद्दा असल्याचे ते म्हणाले.