अहमदनगर शहर राष्ट्रवादीत पदाधिकाऱ्यांच्या पाट्यावरून गोंधळ: पदाधिकाऱ्यांच्या लावलेल्या फलकावरून वादाची ठिणगी

अहमदनगर शहर राष्ट्रवादीत पदाधिकाऱ्यांच्या पाट्यावरून गोंधळ: पदाधिकाऱ्यांच्या लावलेल्या फलकावरून वादाची ठिणगी


नगरएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर स्वतंत्र पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर जिल्हा राष्ट्रवादी भवनात पदाधिकाऱ्यांच्या लावलेल्या फलकावरून वादाची ठिणगी पडली आहे. हा वाद कोतवाली पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांच्या फिर्यादीवरून नावाचा फलक हटवल्याप्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार भाजप, शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर, स्थानिक पातळीवरही अजित पवार व शरद पवार असे दोन गट निर्माण झाले. शरद पवार गटाकडून नगर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर सोपवण्यात आली. तर प्रा. माणिक विधाते हे अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्हा राष्ट्रवादी भवन कार्यालयात पदाधिकाऱ्यांची दालने आहेत.

विधाते यांचा फलक काढल्याचे अजित पवार गटाच्या लक्षात आले, याप्रकरणी विधाते यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी, पुणे येथे कार्यक्रमानिमित्त आलो असल्याचे सांगत, या प्रकाराबाबत माहित नसल्याचे दिव्य मराठीशी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, सायंकाळी कार्यालयाला कुलूप होते.

Advertisement

मी गेलो तेव्हा पाटी नव्हती

कार्यालय राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे असून, पवार साहेबांच्या अधिपत्याखाली आहे. मी काल कार्यालयात गेलो होतो, तेथे ज्येष्ठ नेते किसनराव लोटके होते. तेथे पोहोचल्यावर कोणतीही पाटी नव्हती. लोटके यांनी मला दालनात बसायला सांगितले. नंतर मी बसलो आणि मग निघून गेलो.

Advertisement

– अभिषेक कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष



Source link

Advertisement