अहमदनगरात हिंदू जनजागरण समितीची रॅली: हिंदू धर्मसभेच्या पार्श्वभूमीवर दुचाकी रॅली; खबरदारी म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त


अहमदनगर27 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

अहमदनगर शहरातील सावेडी येथे रविवारी 22 जानेवारी ला होणाऱ्या हिंदू धर्मजागृती सभेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (20 जानेवारी) ला अहमदनगर शहरातील विविध भागातून वाहन रॅली काढण्यात आली. रॅलीत मोटरसायकलवर भगवे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. दरम्यान रॅली दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त प्रयत्न करण्यात आला होता.

Advertisement

अहमदनगर शहरातील सावेडी येथील जॉगिंग ट्रॅक मैदानावर रविवारी हिंदू जनजागरण समितीच्या वतीने हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शहरातून ही रॅली काढण्यात आली. या रॅलीचा प्रारंभ उद्योजक प्रदीप पंजाबी यांनी सपत्नीक पूजन करून केला.अहमदनगर शहरातील माळीवाडा बस स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली.

शहरातील माळीवाडा, सबजेल चौकचौपाटी कारंजा, दिल्लीगेट, तारकपूर चौक, प्रोफेसर चौक, भिस्तबाग, पाईपलाईनरोड, एकवीरा चौक, पारिजात चौक, गुलमोहर रोड, मार्गे या रॅलीची सांगता जॉगिंग पार्क मैदानावर झाली.रॅली सहभागी झालेल्या वाहन चालकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडले.अहमदनगर शहराजवळील निंबोडी दरेवाडी जखणगाव,अरणगाव, सारोळा भागातील युवक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते.

Advertisement

सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड संघटक सुनील घनवट, विश्व हिंदू परिषदेचे ओमप्रकाश बायड, पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा, शिवसेनेचे दिलीप सातपुते, योगीराज गाडे, ओंकार सातपुते, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे बापू ठाणगे,वंदे मातरमचे महावीर कांकरिया प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ दिगंबर गेंटयाल, दिनेश जोशी, संदीप खामकर, बजरंगदलाचे कुणाल भंडारी, सुदर्शन राष्ट्रनिर्माणचे डॉ .पावन आर्य, हिंदू युवा वाहिनीच्या रागिणी तिवारी, भाजप महिला मोर्चाच्या सुरेखा विद्दे आदी सहभागी झाले होते.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement