असे कोणते भावंडे खेळाडू म्हणून आहेत की ज्यांनी आयपीएल ही स्पर्धा गाजवली त्यावर धावता आढावा

असे कोणते भावंडे खेळाडू म्हणून आहेत की ज्यांनी आयपीएल ही स्पर्धा गाजवली त्यावर धावता आढावा
असे कोणते भावंडे खेळाडू म्हणून आहेत की ज्यांनी आयपीएल ही स्पर्धा गाजवली त्यावर धावता आढावा

क्रिकेटमध्ये अनेकदा आपण बाप-लेकांच्या जोड्या खेळताना पाहिल्या आहेत. याबरोबरच काही भावांच्या जोड्याही क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आहेत. भारताकडूनही अशाच काही भावांच्या जोड्या खेळताना दिसल्या आहेत. या भावांनी केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटच नाही, तर आयपीएलची मैदानेही गाजवली आहेत. आज भारतात भाऊ दिवस साजरा होत आहे. त्याच निमित्ताने आपण या लेखात अशाच भारतीय संघासाठी खेळलेल्या भावंडांच्या तीन जोड्यांविषयी माहिती घेणार आहोत, जे आयपीएलमध्येही व भारतीय संघातही खेळले आहेत.

युसूफ पठाण आणि इरफान पठाण

Advertisement

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून हे दोघे भाऊ या स्पर्धेचा भाग राहिले होते. युसूफ पठाण सुरुवातीला राजस्थान रॉयल्समध्ये खेळला होता. त्यानंतर तो केकेआर आणि सनरायझर्स हैदराबादमध्येही खेळला. युसूफ २००८ पासून २०१९ पर्यंत आयपीएमध्ये खेळला आहे. तसेच इरफान पठाण आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात लायंस, रायजिंग पुणे सुपरजायंट्स, सनरायझर्स हैदराबाद व चेन्नई सुपर किंग्स या संघांसाठी खेळला आहे. तो २००८ पासून ते २०१७ पर्यंत आयपीएमध्ये खेळला आहे.

या शिवाय या दोघांनी भारतासाठी अनेक सामने एकत्र खेळले. त्यांनी भारताकडून पहिला एकत्र सामना खेळला तो २००७ च्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात. कारण त्या सामन्यातून युसुफने पदार्पण केले होते. तर इरफान आधीच संघाचा भाग होता. तसेच युसुफ हा २०११ साली भारतीय संघाने विजय मिळवलेल्या विश्वचषकाच्या संघाचा देखील भाग होता.

Advertisement

इरफानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२० वनडे सामन्यात १५४४ धावा आणि १७३ विकेट्स घेतल्या आहेत. तर २९ कसोटी सामन्यात ११०५ धावा आणि १०० विकेट्सची कामगिरी केली आहे. शिवाय टी२० क्रिकेटमध्येही त्याने २४ सामन्यात १७२ धावा व २८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच युसुफने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ५७ वनडे सामने खेळले असुन यात २ शतके आणि ३ अर्धशतकांसह ८१० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने ४१.३६ च्या सरासरीने ३३ विकेट्सही घेतल्या. तसेत त्याने २२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना २३६ धावा केल्या असून १३ विकेट्स घेतल्या आहेत.

कृणाल पंड्या आणि हार्दिक पंड्या

Advertisement

कृणाल पंड्याने आयपीएलमधील त्याच्या कारकिर्दीची सुरुवात २०१६ मध्ये केली होती. मागच्या पाच वर्षापासून तो मुंबई इंडियन्सचा भाग होता. हार्दिकने कृणालच्या आधी एक वर्ष आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली होती. हार्दिकही सहा वर्षे मुंबई इंडियन्सचाच भाग होता. पण आयपीएल २०२२ मध्ये या दोन भावांची जोडी वेगळी झाली. हार्दिक गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार झाला, तर कृणालला लखनऊ सुपर जायंट्सने आपल्या संघात घेतले. आयपीएलमधील दमदार प्रदर्शनाच्या जोरावर दोघांनीही भारतीय संघात स्थान मिळवलेले आहे.

दोघांमध्ये जेष्ठ असलेल्या कृणालने भारताकडून यापूर्वी १९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने १५ विकेट्स घेतल्या असून १२४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ५ वनडेत १३० धावा आणि २ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच धाकटा भाऊ असलेल्या हार्दिकने भारताचे तिन्ही क्रिकेट प्रकारात नेतृत्व केले आहे. त्याने ११ कसोटी सामने खेळताना १७ विकेट्स घेतल्या असून ५३२ धावा केल्या आहेत. तसेच वनडेमध्ये त्याने ६३ सामन्यात १२८६ धावा केल्या आणि ५७ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने ५४ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ५५३ धावा केल्या आहेत आणि ४२ विकेट्स घेतल्या आहेत.

Advertisement

दीपक चाहर आणि राहुल चाहर

वेगवान गोलंदाज असलेल्या दीपक चाहरने त्याची आयपीएल कारकीर्द २०१६ मध्ये सुरू केली होती. तो रायजिंग पुणे सुपरजायंट्स, राजस्थान राॅयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या संघांसाठी खेळला आहे. तो सध्या चेन्नई सुपर किंग्चास भाग असून, त्याचा चुलत भाऊ राहुल काहीवर्षे मुंबई इंडियन्ससाठी खेळला. राहुलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीला २०१७ मध्ये सुरुवात केली होती. आता राहुल पंजाब किंग्सचा भाग आहे. या दोन्ही भावांनी आयपीएमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे आणि त्याच जोरावर भारतीय संघासाठीही खेळले आहेत.

Advertisement

दीपक चाहरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ७ वनडे आणि २० टी२० सामने खेळले आहेत. त्याने वनडेत १० विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये २६ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच राहुलने आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये १ वनडे आणि ६ टी२० सामने खेळले आहेत. त्याने वनडेत ३ आणि आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ७ विकेट्स घेतल्या आहेत.

Advertisement