अश्विनच्या झुंजार खेळीने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत राजस्थान रॉयल्स तिसरा संघ ठरला प्लेऑफसाठी क्वालिफाय

अश्विनच्या झुंजार खेळीने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत राजस्थान रॉयल्स तिसरा संघ ठरला प्लेऑफसाठी क्वालिफाय
अश्विनच्या झुंजार खेळीने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत राजस्थान रॉयल्स तिसरा संघ ठरला प्लेऑफसाठी क्वालिफाय

आर. अश्विनने अडचणीत सापडलेल्या राजस्थान रॉयल्सला नाबाद ४० धावा करून विजयापर्यंत नेले. त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. राजस्थान रॉयल्सने चेन्नईन सुपर किंग्जचे १५१ धावांचे आव्हान ५ फलंदाजांच्या मोबदल्यात शेवटच्या षटकात पार केले. राजस्थानकडून यशस्वी जैसवालने ५९ धावांची खेळी केली. सीएसकेकडून प्रशांत सोळंकीने २ विकेट घेतल्या. या विजयाबरोबरच राजस्थानने प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले. आता ते १८ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे.

आयपीएल २०२२ हंगामातील साखळी फेरी सामन्यांचा टप्पा संपायला आला आहे. साखळी फेरीतील ६८वा सामना शुक्रवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेला हा सामना राजस्थानने ५ विकेट्स राखून जिंकला. यासह राजस्थान संघ प्लेऑफमध्ये पात्र ठरणारा तिसरा संघ ठरला आहे. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघाने १९.४ षटकात ५ विकेट्स गमावत चेन्नईचे लक्ष्य पूर्ण केले.

चेन्नईच्या १५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून सलामीवीर यशस्वी जयस्वालने धुव्वादार अर्धशतक केले. ४४ चेंडू खेळताना त्याने १ षटकार आणि ८ चौकारांच्या ५९ धावांची शानदार खेळी केली. तर कर्णधार संजू सॅमसनने १५ धावांचे योगदान दिले. तसेच डावाअंती अष्टपैलू आर अश्विनने नाबाद ४० धावा करत संघाला सामना जिंकून दिला. २३ चेंडू खेळताना ३ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने त्याने ही मॅच विनिंग खेळी केली.

Advertisement

या डावात चेन्नईकडून नवखा शिलेदार प्रशांत सोलंकीने जबरदस्त गोलंदाजी केली. २ षटके फेकताना २० धावा देत त्याने २ विकेट्स घेतल्या. तसेच सिमरजीत सिंग, मिचेल सेंटनर व मोईन अली यांनीही प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून अष्टपैलू मोईन अली याने सर्वाधिक धावा केल्या. केवळ ७ धावांनी त्याचे शतक हुकले. ५७ चेंडू खेळताना ३ षटकार आणि १३ चौकारांच्या सर्वाधिक ९३ धावा चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त चेन्नईकडून इतर फलंदाजांना मोठ्या खेळी करता आल्या नाहीत. कर्णधार एमएस धोनीने २६ धावा केल्या. तर डेवॉन कॉन्वे १६ धावांवर बाद झाला. इतर फलंदाजांनी एकेरी धावेवर विकेट्स गमावल्या.

या डावात राजस्थानकडून ओबेय मॅककॉय आणि युझवेंद्र चहल यांनी दमदार गोलंदाजी केली. चहलने आपल्या कोट्यातील ४ षटके टाकताना २६ धावा देत २ विकेट्स घेतल्या. तर मॅककॉयने २० धावांवर २ फलंदाजांना बाद केले. तसेच ट्रेंट बोल्ट, आर अश्विन यांनीही प्रत्येकी एका विकेटचे योगदान दिले.

Advertisement