अशोक वाटिका चौकातील वाहतुक सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा: अखेर 350 – 700 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनीचे काम उद्यापासून


अकोला21 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

अशोक वाटिका चौकात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपुलाच्या मुर्तिजापूरकडे जाणाऱ्या लॅन्डींग खाली दबलेली ३५० मिमी तसेच लॅडींगच्या बाजूने गेलेली ७०० मिली मिटर व्यासाची जलवाहिनी अंथरण्याचे काम सोमवार (दि. २३) जानेवारी पासून सुरु होणार आहे. विशेष म्हणजे या जलवाहिनी बदलण्याच्या कामाकडे महापालिकेचे दुर्लक्ष या आशयाने दिव्य मराठीने २७ डिसेंबर रोजी वृत्त प्रकाशित करुन याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

Advertisement

उड्डाणपुलाचे काम करताना लॅन्डींग खाली ३५० मिली मिटर आणि २५ एमएलडी केंद्रातील ६०० मिली मिटर व्यासाची जलवाहिनी दबली होती. या दोन्ही जलवाहिन्या त्याचवेळी वळवणे गरजेचे होते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने १८ डिसेंबर रोजी ६०० मिली मिटर व्यासाची जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे शहरातील ८ जलकुंभाचा पाणी पुरवठा दहा दिवस ठप्प होता.

याच लॅन्डींग खालून नेहरु पार्क जलकुंभावरुन विविध भागांना पाणी पुरवठा करणारी ३५० मिली मिटर व्यासाची जलवाहिनी दबली होती. ६०० मिली मिटर जलवाहिनी वळवताना ३५० मिली मिटर व्यासाची जलवाहिनी बदलणे गरजेचे होते. मात्र ढिसाळ नियोजनामुळे हे काम होवू शकले नाही. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून अशोक वाटिका चौकातील वाहतुक विस्कळीत झाली आहे.

Advertisement

देर आये, दुरुस्त आये, या म्हणी प्रमाणे उशिराने का होईना, आता ३५० मिली मिटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचे काम सोमवार पासून सुरु केले जात आहे. हे काम होईस्तोवर नेहरु पार्क जलकुंभाचा पाणी पुरवठा ठप्प राहिल. मात्र जलवाहिनी अंथरण्याचे काम पूर्ण झाल्या नंतर अशोक वाटिका चौकातील वाहतुक सुरळीत होईल.

७०० मिमीचीही बदलणार

Advertisement

३५० मिली मिटर व्यासाची जलवाहिनी ४० मिटर वळविली जाणार आहे. तर नेहरु पार्क जलकुंभाला पाणी पुरवठा करणारी ७०० मिली मिटर व्यासाची जलवाहिनी क्षतीग्रस्त झाल्याने ही वाहिनी देखील २० मिटर लांब बदलण्याचे काम सुरु केले जाणार आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement